World Food Day | आहाराशी संबंधित चुकीच्या सवयी बदलण्याची गरज, अन्यथा गंभीर आजारांना बळी पडण्याची शक्यता!
आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण बर्याचदा वेळेवर अन्न खात नाही, ज्यामुळे आपण बर्याच आजारांना बळी पडू शकतो.
मुंबई : दरवर्षी 16 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अन्न दिन’ (World Food Day) म्हणून साजरा केला जातो. खाण्यापिण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. कोरोना काळात प्रत्येकजण सकस अन्न खाऊन, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण बर्याचदा वेळेवर अन्न खात नाही, ज्यामुळे आपण बर्याच आजारांना बळी पडू शकतो. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, डॉक्टरांनी आहारावर विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढून, इतर आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. (World Food Day tips for healthy life style)
निरोगी आणि संतुलित आहार घेऊन प्रतिकारशक्ती बळकट करता येते आणि रोगांपासून दूर राहणे देखील शक्य होते. आपल्या शरीरासाठी निरोगी अन्न जितके आवश्यक आहे, तितकेच ते वेळच्यावेळी खाणे देखील आवश्यक आहे. जर तुम्ही चुकीच्या सवयींचे अनुसरण करीत असाल तर, त्या बदलण्याची आवश्यकता आहे. यंदाच्या ‘जागतिक अन्न दिनी’ तुम्हीही खाण्याच्या सवयी बदलण्यासाठी ‘या’ गोष्टींकडे लक्ष देण्याचा निश्चय घेऊ शकता.
सकाळचा नाश्ता टाळू नये.
बरेच लॉक सकाळी नाश्ता करणे टाळतात. परंतु, सकाळचा नाश्ता कधीच टाळू नये, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञदेखील नेहमीच देतात. सकाळची न्याहारी हा दिवसाचा सर्वात महत्त्वाचा आहार आहे. यामुळे आपल्या शरीरास कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते. न्याहारी वगळल्याने बर्याच आजारांना निमंत्रण मिळते. जर तुम्हालाही अशी चुकीची सवय असेल, तर ती आजच बदलायला हवी.(World Food Day tips for healthy life style)
संध्याकाळच्या नाश्त्यात पचनास जड खाद्यपदार्थ टाळा.
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बहुतेक लोकांना तळलेल्या आणि भाजलेल्या गोष्टी खायला आवडतात. या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. बरेच लोक दुपारच्या जेवणात शर्करायुक्त खाद्यपदार्थ खाणे अधिक पसंत करतात. मात्र, जास्त साखरयुक्त आहार आरोग्यास हानिकारक ठरू शकतो. म्हणून आपण आपल्या संध्याकाळी स्नॅक्समध्ये निरोगी गोष्टींचा समावेश केला पाहिजे.
फळे आणि हिरव्या भाज्या खाणे टाळू नये.
बर्याच लोकांना आपल्या आहारात फळे आणि हिरव्या भाज्या खाणे आवडत नाही. फळे आणि हिरव्या भाज्या आपली पचन क्रिया सुधारण्यास मदत करतात. ‘सफरचंद खा आणि डॉक्टरपासून दूर राहा’ या प्रख्यात म्हणीनुसार, दररोज एक सफरचंद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. फळे आणि भाज्यांमध्ये विविध प्रकारची जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे फळे आणि ताज्या भाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.(World Food Day tips for healthy life style)
चहा आणि कॉफीचे कमी प्रमाणात सेवन
आपण सगळेच दिवसाची सुरुवात चहा, कॉफीने करतो. त्यात अँटी ऑक्सिडेंट असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. परंतु, दिवसभरात सतत चहा किंवा कॉफी पिणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याचा परिमाण आपल्या प्रतिकारशक्तीवरही दिसून येतो. त्यामुळे तुम्हालाही जर ही सवय असेल, तर ताबडतोब बदल करणे गरजेचे आहे.
अन्न नीट चावून खावे.
घाईघाईत आपण पटापट अन्न खातो. यामुळे बर्याचदा घरातील वडीलधारी आपल्याला बोल लावतात आणि अन्न नीट चावून खाण्यास सांगतात. अन्न नीट चावून खाल्याने पचन चांगले होते. अन्न न चावता, पटापट गिळले, तर ते शरीरात चरबी म्हणून साठते आणि शरीराला योग्य प्रमाणात पोषणद्रव्ये मिळत नाहीत. म्हणून सर्वांनी अन्न नीट चावून खाल्ले पाहिजे.
(World Food Day tips for healthy life style)
HEALTH | वजन कमी करायचंय?, मग ‘हे’ 5 व्यायाम प्रकार टाळाच!https://t.co/tAJSGpPxiY#Health #FatBurn #exercise
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2020