World Obesity Day | तुमच्या ‘या’ सवयी ठरतात लठ्ठपणाच्या समस्येला कारणीभूत, त्वरित बदलण्याची गरज!

| Updated on: Mar 04, 2021 | 2:12 PM

दरवर्षी 4 मार्च रोजी ‘जागतिक स्थूलपणा दिवस’ (World Obesity Day 2021) जगभर साजरा केला जातो. लोकांना लठ्ठपणाबद्दल जागरूक करणे, हा या दिवसाचा उद्देश आहे.

World Obesity Day | तुमच्या ‘या’ सवयी ठरतात लठ्ठपणाच्या समस्येला कारणीभूत, त्वरित बदलण्याची गरज!
लठ्ठपणा
Follow us on

मुंबई : दरवर्षी 4 मार्च रोजी ‘जागतिक स्थूलपणा दिवस’ (World Obesity Day 2021) जगभर साजरा केला जातो. लोकांना लठ्ठपणाबद्दल जागरूक करणे, हा या दिवसाचा उद्देश आहे. लठ्ठपणा आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. लठ्ठपणामुळे टाईप-2 मधुमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. देशातील 50 दशलक्षाहूनही अधिक लोक लठ्ठपणामुळे ग्रस्त आहेत. लठ्ठपणाचे मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात खाणे. आपण एका दिवसात किती कॅलरी खाता? हे आपल्या आहारावर अवलंबून आहे (World Obesity Day 2021 this habits can cause obesity).

तज्ज्ञांच्या मते, 70 टक्के पेक्षा जास्त लोकांमध्ये लठ्ठपणाचे मुख्य कारण म्हणजे योग्य आहार न घेणे. कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणे आणि शारीरिक हालचालींमध्ये जास्त भाग न घेणे, हे देखील मुख्य कारण असू शकते. याशिवाय वजन वाढणे, हार्मोन्समध्ये बदलाव, औषधे आणि आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे देखील ही समस्या उदभवू शकते.

लठ्ठपणा टाळण्यासाठी निरोगी कॅलरीचे सेवन केले पाहिजे. या व्यतिरिक्त, पिझ्झा, बर्गर, फ्राय, चिप्स यासारखे उच्च कार्ब आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळले पाहिजेत. त्याऐवजी आपण निरोगी स्नॅक्स खाऊ शकता. साखर पेयाऐवजी आपण हर्बल टी घेऊ शकता. आज आपण आपल्याला याच चुकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा आपण कदाचित विचार केला नसेल की, त्या लठ्ठपणाचा धोका वाढवू शकतात. या चुका दुरुस्त करून आपण निरोगी आणि तंदुरुस्त शरीर मिळवू शकता.

अयोग्य अन्न खाणे

जर, आपण जास्त जंक फूड खाणे आणि प्रक्रिया केलेले अन्न खाण्याने आपल्याला लठ्ठपणाचा धोका संभवतो. या प्रकारच्या अन्नात अनहेल्दी कार्बोहायड्रेट असतात, जे आपल्या शरीरात चरबीच्या रूपात साठवले जातात. जर तुम्ही बाहेरील खाद्यपदार्थ वारंवार खाल्ले आणि साखरयुक्त पेयांचे सेवन केले, तर तुम्हाला लठ्ठपणाचा धोका उद्भवू शकतो. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपण आजच ‘या’ सवयी बदलल्या पाहिजेत (World Obesity Day 2021 this habits can cause obesity).

ताण

आजच्या धावपळीच्या आयुष्यात मानसिक ताणतणाव खूप वाढला आहे. बराच काळ ताणतणावात राहिल्यामुळे लठ्ठपणा देखील वाढतो. ताण आपणास आपले वाढते वजन कमी करण्यापासून प्रतिबंधित करतो. वाढत्या लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी ताणतणावाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

व्यायाम

आपण अजिबात व्यायाम न केल्यास आपल्याला लठ्ठपणाचा धोका हा वाढता असतो. व्यायामाच्या अभावामुळे आणि शारीरिक हालचाली न केल्यामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होते आणि शरीर साठून राहिलेली चरबी जळत नाही. ज्यामुळे आपले वजन सतत वाढू लागते.

(टीप : कोणतीही औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(World Obesity Day 2021 this habits can cause obesity)

हेही वाचा :

उन्हाळ्यात आपल्या पर्समध्ये ‘हे’ नक्कीच असू द्या….

कापूराचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत? वाचा…