२०२४ मध्ये सर्वाधिक ट्रेंड झालेले हे व्यायाम, वजन कमी करण्याचे आव्हान म्हणून लोकांनी केले पूर्ण
2024 मध्ये, लोकांनी त्यांच्या आरोग्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आणि सोशल मीडिया साईड वर हे व्यायाम २०२४ मध्ये सर्वाधिक ट्रेंड झाले आहेत. ज्यामुळे अनेक लोकांना त्यांचे वजन कमी करणे सोपे झाले आहे.
2024 हे वर्ष संपत आले असून या वर्षी लोकांनी फिट राहण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर लोकांनी असे व्यायाम सर्च केले ज्याने वजन कमी करण्यास आणि तंदुरुस्त राहण्यास सहज मदत होऊ शकते. फिट राहण्याचे आणि वजन कमी करण्याचे आव्हान पेलण्यासाठी बहुतांश लोकांनी हे व्यायाम केले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात सरत्या वर्षांमध्ये लोकांनी कोणते जास्त व्यायाम सर्च केले असून ते व्यायाम ट्रेडिंग मध्ये आहेत. तुम्ही देखील या व्यायामांचा प्रकार करून तुमचे आरोग्य निरोगी ठेऊ शकता.
लोकांनी सोशल मीडियावर या व्यायाम केले सर्च
सोशल मीडियावर फिजिकली अॅक्टिव्ह राहण्यासाठी अनेक व्यायाम खूप सर्च केले जात होते. सर्वात जास्त सर्च करण्यात आलेले व्यायामांचा लोकांनी त्यांच्या दिनक्रमात समावेश करून घेतला आहे.
10 हजार स्टेप्स
यंदा सोशल मीडियावर व्यायाम फॉलो करण्यात १० हजार स्टेप्स चालणे हे सर्वाधिक ट्रेंडिंग ठरले आहे. फिट आणि स्लिम राहण्यासाठी लोकांनी 10,000 स्टेप्स फॉलो करण्याचा सर्वाधिक प्रयत्न केला आहे. मात्र यावर अनेक डॉक्टरांनी आणि फिटनेस तज्ज्ञांनीही आपलं मत मांडत या ट्रेंडवर फिटनेस लक्षात घेऊन लोकांनी त्यांच्या क्षमतेनुसार 10,000 पेक्षा कमी स्टेप काउंट फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे.
प्लॅंक चॅलेंज
प्लॅंक व्यायाम हा वजन कमी करण्यास आणि विशेषत: पोटातील चरबी कमी करण्यास वेगाने मदत करते. यामुळे सोशल मीडियावरही प्लॅंक एक्सरसाइज खूप ट्रेंड होत आहे. काही लोकांनी पहिल्यांदा ही एक्सरसाइज 20 सेकंदा करत होते. त्यानंतर वाढत ट्रेंड आणि शरीराला होणार फायदा बघता लोकांनी 5 मिनिटांपर्यंत प्लॅंक चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला.
स्क्वाट चॅलेंज
बॉडी टोन करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी सोशल मीडियावर स्क्वॅट चॅलेंजही सुरू झाले आहे. लोअर बॉडीला टोन करण्यासाठी आणि स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी हा एक चांगला व्यायामाचा प्रकार ठरला आहे, जो बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर लोकांनी सर्च स्क्वाट चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
वॉल पिलेट्स
सोशल मीडियावर सध्या वॉल पिलेट्स हा व्यायाम अधिकच पाहिला जात असून अनेक लोक हा व्यायाम करत आहे. यात भिंतीच्या आधारे उभे राहून पोटाची चरबी कमी करण्याचा व कंबर कमी करण्याचा हा व्यायाम व्हायरल झाला आहे. तसेच सार्वधिक लोकांनी या वॉल पिलेट्स अधिक पसंती दिली आहे.
हाय इंटेंसिटी इंटरवल एक्सरसाइज
महिलांना वयाच्या 40 वर्षांनंतर त्यांचे स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी हाय इंटेंसिटी इंटरवल एक्सरसाइजचा सल्ला देण्यात आला आहे. आठवड्यातून तीन ते पाच वेळा केले जाणारे हे व्यायाम वयोमानानुसार तंदुरुस्त राहण्यासाठी लोकांनी पसंत केले आहेत.