तुम्ही राहात असलेली OYO रूम सुरक्षित आहे का? आता हातातल्या कंगव्यानं शोधा हिडन कॅमेरा, वापरा ही सोपी ट्रीक

आपण अनेकदा परराज्यात, परदेशात फिरण्यासाठी जातो. मात्र तिथे असलेली हॉटेलं सुरक्षित असतीलच असं नाही. अनेक हॉटेलच्या रूममध्ये हिडन कॅमेरा बसवण्यात आल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत.

तुम्ही राहात असलेली OYO रूम सुरक्षित आहे का? आता हातातल्या कंगव्यानं शोधा हिडन कॅमेरा, वापरा ही सोपी ट्रीक
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 7:25 PM

अनेकांना पर्यटनाची आवड असते, अनेक जण वेगवेगळ्या स्थळांना, जागेला भेट देण्यासाठी पर्यटन करतात. परराज्यात, परदेशात जातात. पर्यटन करत असताना कपल जर असेल तर विशेष काळजी घ्यावी लागते. कारण आजकाल हॉटेलची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.  अनेक जण विविध ऑनलाईन वेबसाईटवरून घराच्या बाहेर पडण्यापूर्वीच आपल्याला ज्या शहरात जायचं आहे तेथील हॉटेल बुक करतात, मात्र या हॉटेलबाबत आपल्याला फारसं काही माहिती नसतं. तसेच आपण ज्या हॉटेलमधील रूम बुक केली आहे, ती पूर्णपणे सुरक्षित असेल याची खात्री देखील कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा अशा हॉटेलच्या रूममध्ये हिडन कॅमेरा आढळून आल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

त्यामुळे तुम्ही जी हॉटेल बूक केली आहे, त्या हॉटेलमधे राहायला जाण्यापूर्वी ती रूम आधी एकदा नीट चेक करून घेणं गरजेचं असतं. साधारणपणे हिडन कॅमेरे रूममध्ये अशा पद्धतीनं बसवलेले असतात की ते तुमच्या सहजा सहजी दृष्टीस पडू शकणार नाहीत. कुठल्यातरी कोपऱ्यात, तुमच्या रूममध्ये काही फर्निचर असेल तिथे, तुमच्या बेडच्यावर अशा पद्धतीनं हे कॅमेरे बसवलेले असतात. त्यामुळे कुठल्याही हॉटेलमध्ये जात असताना ही काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुमची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.

दरम्यान आता हिडन कॅमेरे बसवण्याची एक नवी पद्धत देखील समोर आली आहे. तुमच्या रूमच्या खिडक्या काचाच्या असतील किंवा तुम्ही ज्या हॉटेलची रूम बुक केली आहे, तिथे एखादं काचेच कपाट असेल तर त्याच्या मागे देखील हिडन कॅमेरा लपवला जाऊ शकतो. यासाठी जो काच वापरला जातो, तो ट्रान्सपरंट असतो. म्हणजे त्या काचेतून दोन्ही साईडने दिसू शकते, अशा काचेच्या मागे जर कॅमेरा बसवला तर तो आपल्याला सहजासहजी दिसून येत नाही.

त्यामुळे अशावेळी नेमकं कारयंच काय तर  तुम्ही ज्या हॉटेलमध्ये मुक्कामासाठी असाल त्या हॉटेलच्या रूममध्ये अशी एखादी काचेची वस्तू असेल तर तिच्या काचेवर कंगवा आडवा धरून पाहायचा ती जर काच ट्रान्सपरंट नसेल तिच्या मागे कॅमेरा लावलेला नसेल तर तुमच्या हातात असलेला कंगावा आणि काचेमध्ये दिसणारा कंगवा यामध्ये तुम्हाला थोडं अतंर जाणवले, पण जर ती काच ट्रान्सपरंट असेल तर तुम्ही जो कंगवा बाहेर धरला आहे, त्याच अंतरावर तुम्हाला काचेमध्ये देखील कगंवा दिसणार त्यामध्ये कोणतंही अंतर दिसणार नाही. अशा पद्धतीनं तुम्हीही सहज हिडन कॅमेऱ्याचा शोध घेऊ शकता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.