उन्हाळ्यात त्वचा ठेवायची असेल कूल आणि फ्रेश तर पुदिन्याचा असा करा वापर
Skincare Routine: उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये पुदिन्याचाही समावेश करू शकता. तो त्वचा थंड ठेवण्याचे काम करते. यासोबतच पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स इत्यादी दूर करते.
नवी दिल्ली : उन्हाळ्यात (summer) त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय केले जातात, अनेक सौंदर्य प्रसाधनेही वापरली जातात. मात्र बाजारात मिळणाऱ्या काही उत्पादनांमध्ये हानिकारक रसायने (chemicals) असू शकतात, ज्यामुळे त्वचेची हानी होऊ शकते. अशा वेळी घरात उपलब्ध असलेल्या साधनांच्या मदतीने त्वचेची छान निगा राखता येणे सहज शक्य आहे. त्यापैकीच एक घटक आहे पुदीना (mint).
पुदिना केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. त्वचेसाठी पुदिना तुम्ही अनेक प्रकारे वापरू शकता. तो त्वचेला थंड ठेवण्याचे काम करते. तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये देखील पुदीना समाविष्ट करू शकता. हे मुरुम आणि ब्लॅकहेड्स बरे करण्यास देखील मदत करते. यामुळे त्वचेची जळजळ शांत होते. हे त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचे काम करते. पुदीना त्वचेला एक्सफोलिएट करते. त्वचेसाठी तुम्ही पुदिना अनेक प्रकारे वापरू शकता.
पुदीना आणि गुलाब पाणी
मूठभर ताजी पुदिन्याची पाने ब्लेंडरमध्ये घ्या. त्यात गुलाबजल टाका. या दोन्ही गोष्टी नीट मिसळा. चेहरा आणि मानेवर लावा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता
पुदीना व लिंबू
मूठभर ताजी पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घ्या आणि ब्लेंडरमध्ये ठेवा. त्याची मऊ पेस्ट बनवा. त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. या दोन्ही गोष्टी मिक्स करून चेहरा आणि मानेला लावा. 15 ते 20 मिनिटे राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.
पुदीना व दही
मूठभर पुदिन्याची पाने घेऊन त्यात एक चमचा दही घाला. हे ब्लेंडरमधून फिरवून घ्या. गरज पडल्यास त्यामध्ये काही थेंब पाणी घाला. एकत्र मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 3 वेळा वापरू शकता.
पुदीना आणि मध
ब्लेंडरमध्ये ताजी पुदिन्याची धुतलेली मूठभर पाने घ्या. त्यात पाणी आणि एक चमचा मध घाला. या सर्व गोष्टी नीट मिसळा. चेहरा आणि मानेवर लावा. 20 ते 25 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.