Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आला उन्हाळा, त्वचेला सांभाळा.. त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेट करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतात फायदेशीर

त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या गोष्टींचा आहारात समावेश करू शकता. या गोष्टी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात.

आला उन्हाळा, त्वचेला सांभाळा.. त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेट करण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 11:01 AM

नवी दिल्ली : उन्हाळ्याची तलखी हळूहळू वाढू लागली असून आता जास्तीत जास्त पाणी पिणे (drink water) गरजेचे आहे. दररोज 7 ते 8 ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. त्यामुळे त्वचा निरोगी (healthy skin) ठेवण्यास मदत होते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ अर्थात टॉक्सिन्सही (toxins) बाहेर पडतात. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याशिवाय तुम्ही इतरही अनेक पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. या पदार्थांमध्ये भरपूर पाणी असते. ते तुमची त्वचा हायड्रेटेड (hydration) ठेवण्यास मदत करतात. ते तुमच्या त्वचेला सखोल पोषण देण्याचे काम करतात.

त्वचेला हायड्रेट ठेवणारे हे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारात अवश्य समाविष्ट करा. निरोगी त्वचेसाठी कोणत्या भाज्या व फळांचे सेवन करता येईल ते जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

काकडी

काकडीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म, खनिजे, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के असतात. त्यात जवळपास 90 टक्के पाणी असते. काकडी तुम्ही सॅलड म्हणून किंवा त्याची कोशिंबीर करूनही खाऊ शकता. काकडीचे सेवन केल्याने तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

टरबूज

टरबूजमध्ये भरपूर पाणी असते. त्यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. ते तुमच्या त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. तसेच तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासही मदत करतात.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये पाण्यासोबतच व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. त्यात लाइकोपीन असते. हे त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक, लेट्युस आणि केल यांचा समावेश होतो. या भाज्यांमध्ये भरपूर पाणी आणि जीवनसत्त्वे असतात. हे त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

बेरीज

बेरीजमध्ये स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरीसारख्या बेरींचा समावेश होतो. ही फळं अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध आहेत. ते फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी कार्य करतात. त्यात भरपूर पाणी आणि जीवनसत्त्वे असतात.

शहाळ्याचे पाणी

शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी हे इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. ते त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. त्यात सायटोकिनिन असते. जे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते.

ॲव्होकॅडो

ॲव्होवोकॅडोमध्ये निरोगी चरबी असते. त्यामुळे तुमची त्वचा मऊ राहण्यास मदत होते. त्यात व्हिटॅमिन ई असते. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करते.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.