Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए…. गार पाण्याने अंघोळ केल्याने वाढू शकते प्रजनन क्षमता !

कोल्ड शॉवर म्हणजेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताभिसरण सुधारणे, प्रजनन क्षमता वाढणे असे आरोग्याचे अनेक फायदे मिळतात.

ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए.... गार पाण्याने अंघोळ केल्याने वाढू शकते प्रजनन क्षमता !
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 3:47 PM

नवी दिल्ली : अंघोळ करणे (taking a bath) आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. दररोज आंघोळ करणे ही चांगली सवय त्यामुळे शरीरावरील मळ तसेच केस स्वच्छ होतात. आपल्याला ताजेतवानेही वाटते. काही लोकांना गार तर काहींना गरम पाण्याने अंघोळ करणे आवडते. पण हिवाळा असो किंवा उन्हाळा, आपण थंड (cold water shower) पाण्याने आंघोळ केली पाहिजे. हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करण्याचा विचार अनेक लोकांना विचित्र वाटू शकतो, परंतु ही पद्धत आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? एनसीबीआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, थंड पाण्याने आंघोळ करणे हे आपले आरोग्य आणि मन दोन्हीसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. तज्ञांच्या मते, यामुळे रक्ताभिसरण सुधारणे (improves blood circulation), प्रजनन क्षमता वाढणे (fertility) यासारखे अनेक आरोग्यासंदर्भातील अनेक फायदे आपल्याला मिळतात. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

प्रजनन क्षमता वाढते

आजकालच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आई किंवा वडील होऊ न शकण्याची समस्या बरीच सामान्य बनली आहे. पण थंड पाण्याने शॉवर घेतल्याने प्रजनन क्षमता वाढते आणि निरोगी लैंगिक जीवनही मिळते, असे अहवालात समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

रक्ताभिसरण सुधारते

शरीरातील रक्ताभिसरण योग्य नसेल तर त्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. पण थंड पाण्याने आंघोळ करून रक्ताभिसरण सुधारू शकते.

आत्मशक्ती वाढते

थंडीच्या दिवसांत गार पाण्याने अंघोल करणे सर्वांना शक्य होत नाही. पण या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमची आत्मशक्ती देखील मजबूत करू शकता. तसंही आता लवकरच उन्हाळा येणार आहे, त्यामुळे थंड पाण्याने आंघोळ करा आणि निरोगी राहा.

तणाव कमी होतो

आपल्या सर्वांना माहित आहे की तणाव किंवा नैराश्यामागील मुख्य कारण म्हणजे खराब मानसिक आरोग्य. तणाव दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी योग, थेरपी किंवा इतर पद्धती वापरल्या जाऊ शकतात आणि थंड पाण्याचा शॉवर हा त्यापैकीच एक आहे.

सतर्कता वाढते

मन शांत करण्यासाठी थंड पाण्याची अंघोळ उपयुक्त ठरतेच. तसेच त्यामुळे शरीरात सतर्कता वाढते. हिवाळ्यात अंघोळ करताना थंडी जाणवते, पण शरीर सामान्य झाल्यावर दिवसभर ताजेतवाने राहते.

त्वचा आणि केस

थंडीपासून वाचण्यासाठी लोक खूप गरम पाण्याने अंघोळ करण्याची चूक करतात आणि त्याचा वाईट परिणाम त्वचेला आणि केसांना सहन करावा लागतो. त्वचेवर पुरळ आणि केस गळणे सुरू होऊ शकते. म्हणूनच दररोज थंड किंवा सामान्य पाण्याने आंघोळ करण्याची सवय लावा.

वजन कमी करण्यास उपयुक्त

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की थंड पाण्याने आंघोळ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमचा लुक सुधारू शकता.

टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी उपयुक्त

थंड पाण्याने आंघोळ करण्याचा एक फायदा म्हणजे ते आपल्यातील लव्ह हार्मोन टेस्टोस्टेरॉन वाढवण्याचे काम करते.

'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.