मानेवरील काळेपणामुळे वाटत्ये लाज ? असे दूर करा टॅनिंग

आपला चेहराच नव्हे तर मानेवरही टॅनिंग असेल तर ते चांगले दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण लूक खराब होऊ शकतो. मानेवरील टॅनिंग हटवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काही घरगुती उपायांनी मदत होऊ शकेल. हे उपाय कोणते, ते जाणून घेऊया.

मानेवरील काळेपणामुळे वाटत्ये लाज ? असे दूर करा टॅनिंग
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 2:27 PM

नवी दिल्ली : आपला चेहरा, मान आणि हात यांचा रोज सूर्य प्रकाशाशी सामना होता. त्यामुळे हे भाग काळवंडतात. तसेच धूळ, प्रदूषण यामुळे या भागांवर मळ साठतो, तसेच टॅनिंग (tanning problem) होते. त्वचेवर एकदा टॅनिंग किंवा काळेपणा आला की ते हटवणे मुश्किल होते. आपण बाहेर पडलो किंवा घरात राहिलो तरी त्वचेचा हा प्रॉब्लेम येतोच. त्यामुळे आपले सौंदर्यही बिघडते. गरमी व उन्हाशिवाय यूव्ही किरणांमुळेही त्वचा (skin problem) काळवंडते.

जर आपले अन्न आणि जीवनशैली योग्य नसेल तर त्याचा आरोग्य आणि त्वचा या दोन्हींवर परिणाम होतो, असे आयुर्वेदातही म्हटले. तसेच शरीरातील मेलॅनिन वाढल्यासही त्वचा काळवंडू लागते. चेहराच नव्हे तर मानेवरही टॅनिंग असेल तर ते चांगले दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण लूक खराब होऊ शकतो.

ते घालवण्यासाठी आपण काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकतो.

काकडीचा रस

त्वचेतील ओलावा कमी होणे हेही टॅनिंगमागचे एक प्रमुख कारण मानले जाते. उन्हाळ्यात ड्रायनेस अथवा कोरडेपणाची समस्या वाढू शकते. मात्र काकडीच्या मदतीने स्किन हायड्रेटेड ठेवू शकतो. एका वाटीत किसलेली काकडी घेऊन त्याचा रस काढून घ्या. नंतर कापसाच्या बोळ्याच्या मदतीने किंवा सरळ हातानेही हा रस टॅनिंग असलेल्या भागावर लावा. हा घरगुती उपाय तुम्ही रोज करू शकता. काही दिवसांतच अपेक्षित फरक दिसून येईल व टॅनिंग कमी झालेले दिसेल.

बटाट्याचा रस

टॅनिंगची समस्या सोडवायची असेल तर घरगुती उपायांमध्ये तुम्ही बटाट्याचा किंवा त्याच्या रसाचा वापर करू शकता. बटाट्याच्या रसात स्टार्चव्यतिरिक्त असे घटक असतात जे स्किन रिपेअर करण्याचे, त्वचेची देखभाल करण्याचे काम करतात. दिवसातून एकदा तरी बटाट्याचा रस काढून तो कापसाच्या मदतीने मानेवर लावा. अंघोळ करण्यापूर्वी या घरगुती उपायाचा अवलंब करणे चांगले ठरते. नियमित वापराने तुम्हाला फरक नक्कीच दिसून येईल.

लिंबाचा रस

आपली त्वचा चमकदार आणि निरोगी हवी असेल तर त्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा वापर करणे फायदेशीर ठरतो. लिंबामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, हे सर्वांनाचा माहीत आहे. लिंबाचा रस लावल्याने त्वचा काही दिवसातच चमकदार दिसू लागते. त्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोन वेळा ज्या भागावर टॅनिंग असेल तिथे लिंबाचा रस, मध व कॉफी यांचे मिश्रण असलेला स्क्रब लावून चोळावे व थोड्या वेळाने धुवून टाका. नियमित वापराने तुम्हाला फरक दिसून येईल. मात्र हा उपाय करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करावी. काहींना लिंबाच्या रसाची ॲलर्जी असू शकते.

कोरफड ठरेल उपयोगी

कोरफडीचे औषधी गुणधर्म तर सर्वांनात माहीत आहेत. ती त्वचेच्या प्रत्येक समस्येवर इलाजासाठी वापरता येऊ शकते. त्यामुळे टॅनिंग, पिंपल्स किंवा त्वचेच्या इतर समस्या दूर करण्यासाठी तुम्ही दररोज कोरफडीचा किंवा कोरफड जेलचा वापर करू शकता. यामुळे टॅनिंगही नक्कीच कमी होते.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.