मेकअप काढण्यापासून ते टाचांच्या भेगा बुजवण्यापर्यंत….नारळाच्या तेलाचे आहेत अनोख फायदे

खोबरेल तेल त्वचेसाठी क्रीमसारखे काम करते. हिवाळ्यात कोरडी आणि निर्जीव त्वचा चमकण्यासाठी नारळ तेल कसे वापरावे ते जाणून घेऊया.

मेकअप काढण्यापासून ते टाचांच्या भेगा बुजवण्यापर्यंत....नारळाच्या तेलाचे आहेत अनोख फायदे
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 4:40 PM

नवी दिल्ली – नारळ (coconut) बाहेरून जितका कठीण दिसतो तो आतून तेवढाच मऊ, पौष्टिक आणि खायला रुचकर असतो. नारळाचे तेल किंवा खोबरेल तेल हे पूर्णपणे नैसर्गिक असते, तसेच त्यात कोणतेही कृत्रिम पदार्थ नसतात. शरीराला जीवनसत्त्वे पुरवणारे खोबरेल तेल हे खाण्यापासून ते त्वचेला लावेपर्यंत पूर्णपणे सुरक्षित असते. त्वचेसाठी (skin) खोबरेल तेल (how to use coconut oil for skin) कसे वापरावे हे जाणून घेऊया.

1) बॉडी स्क्रब बनवा

खोबरेल तेलात मध आणि साखर घालून तुम्ही बॉडी स्क्रब बनवू शकता. यामुळे तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक चमक वाढते. त्यामुळे टॅनिंगच्या समस्येपासूनही आराम मिळतो. जर तुमच्या चेहऱ्याची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही चेहऱ्यावरही हा स्क्रब लावू शकता.

हे सुद्धा वाचा

2) भेगा पडलेल्या टाचा होतात मऊ

एका भांड्यात दोन चमचे खोबरेल तेल घ्या. त्यात तेवढेच तूप घालून चिमूटभर हळद घालावी. नंतर हे नीट मिसळावे आणि टाचांवर लावावे. त्यानंतर पायांवर मोजे घालून ठेवावे. हा उपाय सतत तीन दिवस केल्याने टाचांवर फरक दिसून येतो. जर तुमच्या फाटलेल्या टाचांमधून रक्त येत असेल तर खोबरेल तेल, तूप आणि एरंडेल तेल समप्रमाणात घ्या. हे सर्व नीट मिसळा आणि टाचांवर लावून रात्रभर ठेवावे.

3) पिगमेंटेशन होईल दूर

कोरफडीच्या दोन ते तीन पानांचे जेल चमच्याने काढा. ते मिक्सरमधून नीट बारीक करून घ्या व गाळून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्या. आता यामध्ये अर्धा चमचा केशर आणि चिमूटभर दालचिनी घाला. हे नीट मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे कदाचित तुम्हाला थोडी खाज सुटू शकते. हे मिश्रण पिगमेंटेशनची समस्या दूर होईल.

4) मेकअप रिमूव्हर म्हणून करा वापर

तुम्ही नारळाचे तेल क्लिन्झर म्हणूनही वापरू शकता. मेकअप काढण्यासाठी, कापसाच्या बोळ्यावर तेलाचे काही थेंब घाला व त्वचा नीट पुसा. नंतर ओल्या टॉवेलने चेहरा स्वच्छ पुसा.

5) कापूर व नारळाच्या तेलाचा मास्क

कापूर बारीक करून खोबरेल तेलात मिसळा. यासाठी एका छोट्या तेलाच्या बाटलीत एक चमचा कापूर चांगला मिसळा. आता रात्री झोपताना संपूर्ण चेहऱ्यावर लावा जेणेकरून ते त्वचेत शोषले जाईल. यानंतर नाभीला थोडे तेल लावावे. यामुळे चेहरा चमकदार होईल. शिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला मॉयश्चरायझरची गरज भासणार नाही.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.