Tea Habits | चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, अन्यथा आरोग्यास होऊ शकते हानी!

आपल्यापैकी बहुतेक लोकांना चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते. भारतात असे घर क्वचितच आढळेल जिथे कोणी चहा किंवा कॉफी पिणारी व्यक्ती नसेल.

Tea Habits | चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, अन्यथा आरोग्यास होऊ शकते हानी!
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 5:12 PM

मुंबई : आपल्यापैकी बहुतेक लोकांना चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते. भारतात असे घर क्वचितच आढळेल जिथे कोणी चहा किंवा कॉफी पिणारी व्यक्ती नसेल. बहुतेकांना तर याचे चक्क व्यसनच असते. प्रत्येक घरात चहाला महत्त्व दिले जाते आणि दररोज घरात बनवल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी चहा हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पण काही लोकांना चहा सोबत काहीतरी पदार्थ खाण्याची इच्छाही असते. जसे, रिकाम्या पोटी नुसता चहा प्यायल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते, तसेच आपण चहासोबत खात असलेल्या चुकीच्या पदार्थांमुळेदेखील शरीराला हानी पोहचू शकते. चला तर अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया, ज्याचे चहासोबत सेवन केल्याने शरीराला हानी होऊ शकते…(You should avoid this things while drinking tea)

…तर फक्त चहा प्या.

चहा पिताना आपण कोणत्या प्रकारचे चहा घेत आहात, हे लक्षात घ्या. जर आपण ‘ग्रीन टी’ सेवन करत असाल तर, त्यासोबत दुसरे काहीही खाऊ नका. त्याच वेळी, जर तुम्ही दुधाचा चहा घेत असाल तर, एक किंवा दोन बिस्किटे नक्की खाऊ शकता.

हळदीयुक्त वस्तूंचे सेवन करू नका.

चहा प्यायल्यानंतर लगेच अशा गोष्टी खाऊ नयेत, ज्यात हळदीचे प्रमाण जास्त असेल. कारण, चहा आणि हळदीमधील रासायनिक घटक एकमेकांशी मेळ साधून आपल्या पाचन तंत्राला बरेच नुकसान करतात आणि पोटास हानी पोहोचवू शकणारे घटक तयार करतात.

चहाबरोबर बेसन युक्त पदार्थ खाऊ नका.

बहुतेक लोक चहासोबत बेसन पीठात बनवलेले, तळलेल्या पदार्थ खातात. चहाबरोबर बेसनयुक्त पदार्थांचे सेवन करणे अतिशय धोकादायक आहे. यामुळे आपली पाचक शक्ती कमकुवत होते. याशिवाय शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते (You should avoid this things while drinking tea).

लिंबू किंवा लिंबूयुक्त पदार्थ टाळा.

आपल्यापैकी बरेचजण चहाची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबू किंवा लिंबाचा रस मिसळतात. परंतु, हे मिश्रण आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. त्याचप्रमाणे चहासह अंडी, ऑमलेट खाणे बर्‍याच लोकांना आवडते. हे देखील आपल्या आरोग्यास हळूहळू हानी पोहोचवू शकते.

चहानंतर पाणी पिऊ नका.

चहा प्यायल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. आपल्या घरातील वडीलधारी मंडळीही आपल्याला असे करण्यास प्रतिबंध करतात. कारण चहा पिल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे आपल्या पोटात अनेक समस्या उद्भवतात. चहा घेतल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.

(You should avoid this things while drinking tea)

हेही वाचा :

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.