तुमचा रक्तगट ‘हा’ तर नाही ना? असेल, तर कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक!

आपला रक्तगट हा आपल्यासाठी इतका महत्त्वाचा असतो कि त्यामुळे आपल्या होणाऱ्या आजारांचा आपण नक्कीच अंदाज लावू शकतो. तसेच हार्ट अटॅक या आजाराचा. रक्तगटावरून हार्ट अटॅक येऊ शकतो का? याचा अंदाज लावू शकतो.

तुमचा रक्तगट 'हा' तर नाही ना? असेल, तर कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक!
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 4:01 PM

रक्ता तपासणीमुळे आपल्याला असलेले बरेच आजार समजू शकतात. त्यामुळे आजारी असलं किंवा कोणत्या आजाराचे निदान जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर आधी रक्त तापसण्यास सांगतात. तसेच रक्तगटावरून तुमच्या हृदयाचे स्वास्थही समजते. आणि त्यामुळे भविष्यात हार्ट अटॅक कधी येऊ शकतो का याचाही अंदाजा लावला जाऊ शकतो.

रक्तगटातूनही काही आजारांची पूर्वकल्पना आपण करू शकतो. प्रत्येक रक्तगट हे आपल्या आरोग्याशी संबंधित धोके दर्शवतो. तर जाणून घेऊयात कोणत्या रक्तगटामुळे नेमके काय आजार उद्भवू शकतात ते किंवा कोणत्या रक्तगटाला आजारांचा धोका असतो ते.

आपल्या सर्वांनाच माहित आहे की A, B, AB आणि O हे प्रमुख रक्तगट आहेत. आणि प्रत्येक रक्तगटाचे वेगवेगळे संकेत असतात.

पहिला रक्तगट आहे रक्तगट A : जर तुमचा रक्तगट A असेल तर आणि या रक्तगटाच्या व्यक्तींचा जीवनशैली योग्य नसेल, तर त्यांना हृदयविकार, गॅस्ट्रिक कर्करोग, आणि स्मॉलपॉक्स होण्याचा धोका अधिक असतो.

रक्तगट B : B रक्तगटाच्या व्यक्तींना टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. काही ऑटोइम्यून आजार, आणि स्क्लेरोसिस होण्याचा धोकाही असतो.

रक्तगट AB : AB रक्तगटाच्या व्यक्तींना स्मृतीभ्रंश किंवा वयापूर्वीच स्मरणशक्ती कमजोर होण्याचा त्रास होतो. याचे मुख्य कारण म्हणजे मेंदूपर्यंत रक्तप्रवाह कमी होणे.

रक्तगट O : O रक्तगटाच्या व्यक्तींचे आरोग्य तुलनेने चांगले असते. पण त्यांना पेप्टिक अल्सर, रक्ताशी संबंधित समस्या, आणि हृदयविकाराचा धोका असतो.

रक्तगटाचे महत्त्व: प्रत्येक व्यक्तिचा रक्तगट हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्यामुळे त्याला असणाऱ्या व्याधी किंवा भविष्यात होऊ शकणाऱ्या व्याधीबाबत स्पष्टता येते. त्यानुसार ती व्यक्ती तशी काळजी घेऊ शकते.

रक्तगटातून अँटीजेन शरीराच्या जैविक प्रक्रियांवर कसा परिणाम करतो हे समजते. अँटीजेनमुळे संक्रमण, दाह, आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत संकेत देतो. उदाहरणार्थ, A रक्तगटात विलिब्रँड घटकाचा स्तर जास्त असतो. हा प्रथिन घटक रक्त गोठण्यास मदत करतो, पण तो जास्त असल्यास हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

रिपोर्टनुसार रक्तगटावरून काही आजारांचे संकेत मिळू शकतात. मात्र, यातून कोणाला निश्चित आजार होईलच असे मानता येत नाही. रक्तगटाचा कोणत्याही आजाराला थेट कारणीभूत ठरण्याचा पुरावा अद्याप तरी समोर आलेला नाही. तरही प्रत्येकाने आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतलेली कधीही चांगली.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.