तरुणांनो ‘दिल’ जपा, तुम्हाला हृदयविकारांची संकेत देणारी ‘ही’ लक्षणं जाणवतायत?

जीवनशैलीतील बदल आणि पोषक आहाराचा अभाव ही महत्वाची कारणे यामागे सांगितली जातात. त्यामुळे ज्येष्ठांसोबत तरुणांमध्ये हृदयविकाराच्या (HEART ISSUE) प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

तरुणांनो ‘दिल’ जपा, तुम्हाला हृदयविकारांची संकेत देणारी ‘ही’ लक्षणं जाणवतायत?
हृदय आणि हृदयविकाराशी संबंधित महत्त्वाचं माहिती..
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 10:43 PM

मुंबईमानवी निरोगी आयुष्यासाठी हृदयाची (LIFE OF HEART) क्रियाशीलता महत्वपूर्ण ठरते. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदय संबंधित अनेक विकार उद्भवले आहेत. जीवनशैलीतील बदल आणि पोषक आहाराचा अभाव ही महत्वाची कारणे यामागे सांगितली जातात. त्यामुळे ज्येष्ठांसोबत तरुणांमध्ये हृदयविकाराच्या (HEART ISSUE) प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरुणांमध्ये वाढत्या हृदयविकाराच्या घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे यासाठी एकाधिक कारणे सांगितली जातात. मात्र, शाश्वत हृदयाचं निरोगीपण (HEALTHY HEART) जपण्यासाठी वेळीच सावध पावलं उचलायला हवीत. योग्य वेळी हृदयाच्या समस्येवर उपाय केल्यास आपत्कालीन स्थितीत होणाऱ्या दुर्घटना टाळता येतात. तुमच्या हृदयाच्या निरामय आरोग्यासाठी तुम्हाला महत्वपूर्ण पाऊलं वेळीच उचलायला हवी. त्यामुळे नेमकी कोणती लक्षणे आहेत जाणून घेऊया-

1. सातत्याने मळमळ आणि छातीत जळजळ (Nausea And Heartburn)

हृदयाची कार्यक्षमता मंदावल्याची अनेक लक्षणे दिसून येतात. यामध्ये व्यक्तीला छातीत जळजळ किंवा मळमळ जाणवू लागते. तुम्हाला दीर्घकाळ अशाप्रकारची लक्षणे दिसत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेणं अत्यंत महत्वाचं आहे.

2. उच्च रक्तदाब (High Blood Pressure)

हृदय विकार जडण्यात अनियंत्रित रक्तदाब देखील महत्वाचं कारण ठरतं. वाढत्या रक्तदाबामुळे हृदयाची कार्यशीलता मंदावते. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार आणि हृदय क्रिया बंद पडण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी नियमित स्वरुपात आपला रक्तदाब तपासण्याची आवश्यकता आहे.

3. खांदेदुखी आणि छातीत चमक (Shoulder and Chest Pain)

हृदयविकाराच्या प्रारंभिक स्थितीत तीव्र खांदेदुखीची समस्या भेडसावते. तसचे छातीत चमकाही निघतात. त्यामुळे अशा स्थितीचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तीने वेळेत वैद्यकीय उपचारांचा आधार घ्यायलाच हवा. अन्यथा तुमचे दुर्लक्ष वैद्यकीय आपत्तीत परावर्तित होऊ शकते.

4. झोपेची तीव्र समस्या (Snoring and Sleep Problems)

श्वसनात अडथळे किंवा श्वसनास त्रास होण्यामुळे घोरण्याची समस्या निर्माण होते. तसेच झोपेत अनियमितता जाणवते. त्यामुळे झोपेत अनियमितता जाणवत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार घेणे आवश्यक ठरते.

5. अस्वस्थता आणि छातीत दबाव (Restlessness and Chest Pain)

अस्वस्थता आणि छातीत दबाव निर्माण होत असल्यास दुर्लक्ष करणे टाळावे. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे डोकेदुखी किंवा अस्वस्थतेची भावना निर्माण होऊ शकते

6. श्वसनास अडथळा (Shortness of Breath)

श्वसनास अडथळा किंवा श्वसन संबंधित समस्या हृदय विकाराचं कारण ठरू शकतात. श्वसनास अडथळा जाणवणं हृदय संबंधित विकाराचं कारण ठरू शकतं. त्यामुळे जटिलतेत वाढ होण्यापूर्वीच तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे महत्वपूर्ण ठरतं.

Rose Day 2022 : रोज डे ला पहिल्यांदा पार्टनरसोबत डेटला जाणार आहात? असे सरप्राइज की भेटीला चार चाँद लागतील !

Beauty Tips : जिद्दी ब्लॅकहेड्स काढायचे असतील तर हे 5 सोपे उपाय नक्की करून पाहा!

Anti Aging Face Pack : चिरतरुण दिसायचयं? तिशीनंतर तरूण चेहरा हवा आहे? मग हा अँटी-एजिंग फेसपॅक चेहऱ्यावर नक्की लावा!

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.