Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात तुमच्या लॅपटॉपचे नुकसान होण्यापासून वाचवतील ‘या’ टिप्स, नक्की फॉलो करा

तुम्ही दररोज तासंतास लॅपटॉपवर काम करत असाल तर उन्हाळ्यात तुम्हाला अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. उन्हाळ्याच्या हंगामात काही चुकांमुळे लॅपटॉपमध्ये स्फोटही होऊ शकतो. सिस्टीममध्ये स्फोट होण्याचा धोका वाढण्यामागील कारणे कोणती आहेत आणि स्फोट टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? ते आपण आजच्या या लेखातुन जाणून घेऊयात...

उन्हाळ्यात तुमच्या लॅपटॉपचे नुकसान होण्यापासून वाचवतील 'या' टिप्स, नक्की फॉलो करा
Follow us
| Updated on: Apr 07, 2025 | 2:27 PM

उन्हाळ्याच्या हंगामात वातावरणातील उष्णतेमुळे इलेक्ट्रिक गॅझेट्स जास्त गरम होण्याची समस्या वाढते, जर तुम्ही देखील लॅपटॉप वापरत असाल तर तुमच्याकडे सिस्टमशी संबंधित महत्त्वाची माहिती असायला हवी. बऱ्याचदा लॅपटॉप असे सिग्नल व मेसेज देखील देतो जे आपल्याला समजत नाहीत आणि त्यामुळे लॅपटॉपचा स्फोट होण्याचा धोका वाढतो. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात कोणत्या चुकांमुळे तुमच्या लॅपटॉपमध्ये स्फोट होऊ शकतो हे आपण जाणून घेणार आहोत. .

जेव्हा लॅपटॉपमध्ये जास्त गरम होण्याची समस्या येते तेव्हा सिस्टमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ लागतो. अशातच तुमचा लॅपटॉप गरम झाल्यानंतर ही तुम्ही सिस्टम वापरत राहिलात तर लॅपटॉपमध्ये स्फोट होऊ शकतो. लॅपटॉप जास्त गरम होण्याची अनेक कारणे असू शकतात. उष्णतेव्यतिरिक्त, जर सिस्टममध्ये बसवलेला पंखा नीट काम करत नसेल तर जास्त गरम होण्याची समस्या देखील उद्भवू शकते.

या उपयुक्त टिप्स लक्षात ठेवा

हे सुद्धा वाचा

वर्षानुवर्षे लॅपटॉप वापरल्यानंतर, पोर्टमध्ये घाण जमा होऊ लागते ज्यामुळे लॅपटॉपमध्ये निर्माण होणारी उष्णता सिस्टममधून बाहेर पडू शकत नाही. यामुळेच लॅपटॉप जास्त गरम होण्याच्या समस्या वाढू लागतात, ज्यामुळे स्फोट देखील होऊ शकतो. हे टाळण्यासाठी, उन्हाळ्यात लॅपटॉप सर्व्हिस सेंटरमधून पूर्णपणे स्वच्छ करा.

बऱ्याचदा लोक मांडीवर किंवा बेडवर लॅपटॉप ठेऊन वापरण्यास सुरुवात करतात. असे केल्याने, लॅपटॉपमधील व्हेंट्स ब्लॉक होतात आणि उष्णता योग्यरित्या बाहेर पडू शकत नाही. उन्हाळ्यात केलेली ही चूक तुमचे मोठे नुकसान करू शकते, लॅपटॉप टेबलावर ठेवून वापरणे नेहमी चांगले.

जर तुमच्या लॅपटॉपचा चार्जर खराब झाला असेल आणि तुम्ही बाजारात जाऊन ओरिजनल चार्जरऐवजी साधा चार्जर घेतला तर यामुळे तुमचा लॅपटॉप जळून जाऊ शकतो. हे साधे चार्जर किंवा दुसऱ्या कंपनीचा चार्जर तुमच्या सिस्टममधील उष्णता वाढवू शकतो, ज्यामुळे स्फोट होण्याचा धोका वाढतो.

या टिप्स लक्षात ठेवल्याने तुम्हाला उन्हाळ्यात लॅपटॉप वापरताना कोणत्याच समस्या निर्माण होणार नाही.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.