Immunity Booster | प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात ‘या’ झिंकयुक्त पदार्थांचा नक्की समावेश करा!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाला जोरदार धडक दिली आहे. लोक स्वत:ला या विषाणूंपासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

Immunity Booster | प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात ‘या’ झिंकयुक्त पदार्थांचा नक्की समावेश करा!
फूड
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 8:43 AM

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाला जोरदार धडक दिली आहे. लोक स्वत:ला या विषाणूंपासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दुहेरी मास्क घालण्यापासून ते आहारात व्हिटामिन समृद्ध अन्न खाण्यापर्यंत, लोक विषाणूला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीयत. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लोक आपल्या आहारात अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थाचा समावेश करत आहेत, ज्यामध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन ए किंवा इतर अँटीऑक्सिडेंट्सचा समावेश आहे (Zinc rich food for boosting immunity power).

तथापि, लोक अतिशय महत्त्वपूर्ण ‘झिंक’ या पोषक घटकाकडे दुर्लक्ष करत आहेत. हे घटक आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात आणि शरीरातील 300 एंजाइम सक्रिय करून एका ढाली प्रमाणे काम करतात. कारण इतर सूक्ष्म पोषकांप्रमाणे झिंक आपल्या शरीरात जमा होत नाही, म्हणूनच दररोज त्याचे सेवन करणे आवश्यक आहे. या कठीण काळात आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण आहारात या 5 झिंकयुक्त खाद्य पदार्थांचा समावेश करू शकता…

  1. डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये झिंक आणि फ्लॅव्हॅनॉलचे प्रमाण जास्त आहे. हे केवळ रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करत नाही, तर रक्तदाब आणि रक्त प्रवाह देखील नियंत्रित करते. दररोज किमान 28 ग्रॅम डार्क चॉकलेट सेवन केले पाहिजे

  1. शिंपल्या (सी फूड)

सीफूडमध्ये सर्वाधिक झिंकचे प्रमाण आहे. जर आपण ऑयस्टर अर्थात शिंपल्या खात असाल तर या 50 टक्के झिंक आणि कमी कॅलरी असते. तर त्यात व्हिटामिन बी 12 आणि सेलेनियम देखील असते (Zinc rich food for boosting immunity power).

  1. काजू आणि भोपळा बिया

काजू आणि भोपळ्या बिया आपण नियमित आहारात बाप्रू शकता. स्मूदी, ओट्स इत्यादीत हे घटक घालता येतात. झिंक व्यतिरिक्त, त्यात तांबे, व्हिटामिन ए, लोह, मॅग्नेशियम फोलेट आणि व्हिटामिन के अधिक असते. भोपळ्याच्या बिया कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करतात.

  1. मांस

लाल मांस, कोंबडी, अंडी हे जस्त आणि प्रथिने यांचा उत्कृष्ट स्रोत आहेत. तथापि, आपण त्यांचे प्रमाणात सेवन करावे. कारण त्यात कॅलरी अधिक आहे. तसेच, त्यात उपस्थित बी 12 प्रथिने तयार करते, जे मज्जासंस्था सक्रिय ठेवते.

  1. शेंगा

जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी त्यांच्या आहारात शेंगांचा समावेश करावा. कारण त्या जस्त समृद्ध असतात. आणि त्यात मॅंगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि तांबे हे घटक देखील असतात.

कोरोना  साथीच्या या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणून आपण या सर्व गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपण स्वत: ला निरोगी ठेवू शकता आणि कोरोना व्हायरस संसर्ग टाळू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Zinc rich food for boosting immunity power)

हेही वाचा :

मधुमेहग्रस्त रुग्णांनी आहारात अवश्य समाविष्ट करा ‘ही’ डाळ, रक्तातील साखर राहील नियंत्रित!

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘ऊसाचा रस’ पिणे जबरदस्त फायदेशीर, वाचा !

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.