AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव लोकसभा : युती न झाल्यास भाजपसमोर जागा राखण्याचं आव्हान

जळगाव : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. आता नंबर आहे जळगाव लोकसभा मतदारसंघाचा. अनेक नामदार घडवणाऱ्या एरंडोल लोकसभा मतदारसंघाचा जळगाव ग्रामीण लोकसभा मतदारसंघ झाल्यावर येथून खासदार ए. टी. पाटील राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन विजयी झाले. राष्ट्रवादीच्या सतीश पाटील यांचा त्यांनी 3 लाख […]

जळगाव लोकसभा : युती न झाल्यास भाजपसमोर जागा राखण्याचं आव्हान
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

जळगाव : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. आता नंबर आहे जळगाव लोकसभा मतदारसंघाचा. अनेक नामदार घडवणाऱ्या एरंडोल लोकसभा मतदारसंघाचा जळगाव ग्रामीण लोकसभा मतदारसंघ झाल्यावर येथून खासदार ए. टी. पाटील राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन विजयी झाले. राष्ट्रवादीच्या सतीश पाटील यांचा त्यांनी 3 लाख 83 हजार 525 मतांनी पराभव केला. सतीश पाटील यांना फक्त 2 लाख 64 हजार 228 मते मिळाली होती. सलग दुसऱ्या वेळा ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. विद्यमान खासदारांकडून जळगावकरांची निराशा झाल्याचं सध्याचं चित्र आहे.

यापूर्वी एरंडोल लोकसभा मतदारसंघ म्हणून हा मतदार संघ ओळखला जात होता. केंद्रीय मंत्री हरी विनायक पाटसकर, सोनसिंग धनसिंग पाटील, उत्तमराव पाटील, विजय नवल पाटील आणि त्यानंतर या मतदारसंघाचं सलग चार वेळा माजी केंद्रीय मंत्री, एम के. पाटील यांनी प्रतिनिधीत्व केलं. मात्र “पाटील इज मनी, मनी इज पार्टी”, असं वक्तव्य जनतेचे प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचं वृत्त माध्यमांवर गाजलं आणि पाटील यांचं तिकीट कट झालं. बी. एस. पाटील यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीच्या काकासाहेब मोरे यांनी बाजी मारली. त्यांचा कार्यकाळ अल्प राहिला, नंतर राष्ट्रवादीकडून भाजपात आलेल्या खासदार ए. टी. पाटील यांनी त्यांना धूळ चारली. त्या नंतर पुन्हा परोळ्याच्या सतीश पाटलांचा ए. टी. पाटील यांनी 2014 साली पराभव केला. भोरस त्यांनी घेतलेलं दत्तक गाव मात्र आदर्श होऊ शकलं नाही. अनेक समस्या या मतदारसंघात आहेत. रोजगाराची साधने नाहीत, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबल्या, मात्र ज्या हव्यात त्या थांबत नाहीत.

चाळीसगाव येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार के. की. मूस कलादालन आहे. शून्याचा शोध लावणाऱ्या भास्कराचार्य यांचा वास पाटणा येथे होता. वेरूळ अजिंठा लेणी, येथून 70 किमी अंतरावर आहे. तर हिंदू-मुस्लीम भाविकांचं आराध्य दैवत पीर मुसा कादरी दर्गा येणाऱ्या भाविकांची कर्नाटक, महानगरी या ठिकाणी थांबावी अशी मागणी कायमच आहे. इतर तालुक्यात देखील फारशी कामे झालेली नाहीत म्हणून जळगाव मतदार संघात नानांकडून अपेक्षाभंग झाल्याचा आरोप होत आहे. स्वपक्षीयांनी आता त्यांच्या विरोधात दंड थोपटलेत. जिल्हा अध्यक्ष उदय वाघ, चाळीसगावचे विद्यमान आमदार लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत देत आहेत. यामुळे पक्षांतर वाद विकोपाला गेलेत.

राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. यावेळी पारोळा सोडून दुसरा उमेदवार शोधला जातोय. चित्रसेन पाटील, प्रमोद पाटील यांचे नावे समोर आल्यावर आता पुन्हा सरकारी अभियोक्ता उज्ज्वल निकम यांचं नाव पुढे येत आहे. तर शिवसेनेनेही माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या रूपाने त्याना आव्हान उभे केलंय.

जिल्ह्यात तसं भाजप आणि शिवसेनेचं प्राबल्य आहे. जळगाव ग्रामीणमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी जळगाव शहर आणि चाळीसगाव भाजपकडे, तर जळगाव ग्रामीण आणि पाचोरा शिवसेनेकडे आहे. अंमळनेरमध्ये अपक्ष आमदार आहे, तर एरंडोल राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीतही भाजपने सत्ता मिळवली आहे. त्यामुळे युती होते की नाही यावर पुढील समीकरणे अवलंबून असतील.

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.