नागपूर लोकसभा: संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, गडकरींसमोरील आव्हानं काय?

Nagpur Loksabha नागपूर: देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु होत आहे. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा टीव्ही 9 मराठी घेत आहे.  नागपूर लोकसभा निवडणुकीत संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, अशा लढतीचं चित्र नेहमीच पाहायला मिळतं. आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघानंतर भाजपसाठी नागपूर देशातील सर्वात […]

नागपूर लोकसभा: संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, गडकरींसमोरील आव्हानं काय?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

Nagpur Loksabha नागपूर: देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु होत आहे. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा टीव्ही 9 मराठी घेत आहे.  नागपूर लोकसभा निवडणुकीत संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, अशा लढतीचं चित्र नेहमीच पाहायला मिळतं. आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघानंतर भाजपसाठी नागपूर देशातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ आहे. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय याच मतदारसंघात आहे. शिवाय मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी भाजपचा चेहरा असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळेच नागपूरची लढत भाजपसाठी प्रतिष्ठेची आणि तेवढीच महत्त्वाची आहे.

नागपूरमध्ये भाजपचा सर्वात मोठा विजय

सोळाव्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा दारुण पराभव झाला  आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी 2 लाख 85 मतांनी विजय मिळवला.  गडकरींना 54.17 टक्के मतं मिळाली होती. आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा हा सर्वात मोठा विजय होता.

गडकरींचा मार्ग सुकर?

संसदीय लोकशाहीमध्ये सार्वत्रिक निवडणूक ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. यात इतिहासातील निवडणुकीच्या निकालापेक्षाही वर्तमानातील निवडणूक जास्त महत्त्वाची असते. कारण पाच वर्षांत बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असतं. त्यामुळेच गेल्या निवडणुकीत 2 लाख 85 हजार मतांनी निवडून आले असतानाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मतदारसंघावरील पकड कधीही सैल होऊ दिली नाही. सोमवार ते शुक्रवार ते देश फिरत असले, तरी शनिवार आणि रविवार त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी दिला. त्यामुळेच 2019 मध्ये होणाऱ्या सतराव्या लोकसभा निवडणुकीतही विजय गडकरींसाठी कठीण नाही, असं जाणकार मानतात. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य नितीन गडकरी यांना कायम ठेवता येणार का? याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.

मतदारसंघातील जातीय समीकरण

नागपूर लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरणं कधीच भाजपच्या बाजूनं नव्हती आणि आजंही नाही. नागपूर लोकसभा मतदारसंघात दलित, मुस्लिम, तेली, कुणबी आणि हलबा या जातींचं प्राबल्य आहे. यात मुस्लिम, दलित आणि काही प्रमाणात कुणबी हे परंपरागत काँग्रेसचे मतदार आहेत. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत फक्त दोन वेळाच भाजपला या मतदारसंगात यश मिळालं. त्यात नितीन गडकरी यांचा समावेश आहे. परंपरागत मतांच्या भरवशावरच काँग्रेसचे विलास मुत्तेमवार नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आले. पण नितीन गडकरी यांच्या सर्वसमावेशक राजकारणाने नागपूर लोकसभा मतदारसंघावर भाजपनं आपली पकड अधिक मजबूत केली आहे.

निर्णायकी हलबा समाज

2019 च्या लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणं जास्त महत्त्वाची ठरणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीशी उभा असललेला हलबा समाज यावेळेस कमालीचा नाराज आहे. केंद्र आणि राज्य सरकराने त्यांची मागणी मान्य न केल्याने हलबा समाज आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवतात. नागपूरात एका लाखापेक्षा जास्त हलबा समाजाची मतं आहेत. त्यामुळे ही मतं भाजप आणि काँग्रेसससाठीही तेवढीच महत्त्वाची असतील. हलबासोबतच दलित, मुस्लिम समाजाची मतंही महत्त्वाची आहे. नाराज हलबा, दलित आणि मुस्लिम मतदार एकत्रपणे काँग्रेसकडे वळले तर भाजपची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे. पण असं होऊ नये यासाठी भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

2019 मध्ये गडकरींविरोधात कोण?

नागपूर लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात कोण? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नागपुरात गडकरींच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसकडे भली मोठी लिस्ट आहेत. माजी मंत्री नितीन राऊत, माजी आमदार आशिष देशमुख, प्रफुल्ल गुडधे पाटील, माजी खासदार विलास मुत्तेमवार, ओबीसी नेते बबनराव तायवाडे, माजी खासदार नाना पटोले, विकास ठाकरे, यापैकी काँग्रेस कुणाला संधी देते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसने केलेल्या सर्व्हेमध्ये प्रफुल्ल गुडधे, विकास ठाकरे आणि बबनराव तायवाडे यांची नावं सध्या आघाडीवर आहेत. पण आशीष देशमुख यांनाही नागपुरातून संधी दिली जाऊ शकते. ‘संघभूमी विरोधात दीक्षाभूमी’ या लढतीसाठी आपण तयार असल्याचं सांगत माजी मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेससमोरचा पेच आणखी वाढवला आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघात बसपाची उमेदवारी कुणाला मिळते, यावरंही बरीच गणितं अवलंबून आहेत. कारण नागपूर लोकसभा मतदार संघात बीएसपीचे एक कॅडरबेस मतदार आहेत. याच मतांच्या भरवशावर गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत बीएसपीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. बीएसपीच्या मतांच्या टक्केवारीवरंही काँग्रेसच्या मतांचं गणित अवलंबून आहे. नागपुरात शिवसेनेची फारशी ताकद नाही. त्यामुळे शिवसेना वेगळी लढली किंवा भाजपसोबत, त्याचा फार परिणाम होण्याची शक्यता तशी कमीच आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघाची रचना

खासदार- नितीन गडकरी, भाजप

प्रमुख विरोधक- विलास मुत्तेमवार, काँग्रेस

सहा विभानसभा –

पूर्व नागपूर – कृष्णा खोपडे, आमदार, भाजप

मध्य नागपूर – विकास कुंभारे, आमदार, भाजप

उत्तर नागपूर – डॉ. मिलिंद माने, भाजप

दक्षिण-पश्चिम- देवेंद्र फडणवीस, आमदार, भाजप

नागपूर दक्षिण – सुधाकर कोहळे, आमदार, नागपूर

नागपूर पश्चिम- सुधाकर देशमुख, आमदार, भाजप

नागपूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. त्यात शहरी भागातील सहा विधानसभा मिळून नागपूर लोकसभा मतदारसंघ, तर दुसरा नागपूर ग्रामिणचे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून रामटेक लोकसभा मतदारसंघ आहे. नागपूर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात पूर्व नागपूर, मध्य नागपूर, उत्तर नागपूर, नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर पश्चिम आणि नागपूर दक्षिण. या सहाही विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत.

 2019 मध्ये हे मुद्दे गाजणार

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विकासाच्या नावाने मतदारांना मतं मागणार आहेत. गेल्या पाच वर्षात नितीन गडकरी यांनी नागपूर शहरात सिमेंट रस्ते, पूल आणि इतर विकास कामं केली आहेत. त्यामुळे हीच कामं घेऊन ते नागपुरातील मतदारांपुढे जाणार आहेत. तर विरोधक मात्र अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरणार आहेत. त्यात महागाई,  बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या,  शेतमालाचे पडलेले भाव,  भ्रष्टाचार,  मॉब लिचिंग,  राम मंदिर,  स्वतंत्र विदर्भ, या निवडणुकीत असे विविध मुद्दे घेऊन काँग्रेस भाजपला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे.

नागपुरात गटातटात विभागलेली काँग्रेसच काँग्रेसचा पराभव करते, असंही म्हटलं जातं. पण पाच वर्षे सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर गटतट विसरुन भाजपविरोधात काँग्रेसचे सर्व नेते एकत्र येणार का? हाही सर्वात मोठा प्रश्न आहे. पण काँग्रेसने जातीय समीकरणं पाहून तिकीटं दिली आणि सर्व गट एकत्र आले, तर आगामी 2019 च्या निवडणुकीत संघाचा गड असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला टक्कर दिली जाऊ शकते. पण सध्याच्या परिस्थितीत चार वेगवेगळ्या गटात विभागलेली काँग्रेस आतातरी एकत्र येतील याची शक्यता तशी कमीच आहे.

नागपूर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेला आणि केंद्रातील दिग्गज मंत्री नितीन गडकरी यांचा मतदारसंघ आहे, त्यामुळेच या मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. 2014 च्या निवडणुकीत नितीन गडकरी यांनी या मतदारसंघात मोठा विजय मिळवला होता. आगामी 2019 च्या निवडणुकीतही त्यांचा विजय सोपा मानला जातो. पण गेल्यावेळेच मताधिक्य त्यांना राखता येईल का, याबाबत मात्र मतभिन्नता आहे.

संबंधित बातम्या 

उस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादी जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेणार?  

माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?   

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.