उस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादी जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेणार?

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पावन झालेला उस्मानाबाद जिल्हा.. तुळजाभवानी मातेचे मंदिर तुळजापूर येथे असल्याने देवीच्या दर्शनासाठी इथे सर्वपक्षीय नेते मंडळींचा राबता नेहमी असतो.. लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक, आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन आणि देवीचा कौल घेऊन निवडणूक प्रचाराला सुरुवात होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि […]

उस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादी जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेणार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पावन झालेला उस्मानाबाद जिल्हा.. तुळजाभवानी मातेचे मंदिर तुळजापूर येथे असल्याने देवीच्या दर्शनासाठी इथे सर्वपक्षीय नेते मंडळींचा राबता नेहमी असतो.. लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक, आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन आणि देवीचा कौल घेऊन निवडणूक प्रचाराला सुरुवात होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ तुळजाभवानी दर्शनाने करते असा आजवरचा अनुभव आह. त्यामुळे तुळजापूर पर्यायाने उस्मानाबाद जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व नेहमी चर्चेत राहते.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक 40 असून सध्या शिवसेनेचे रवींद्र गायकवाड हे खासदार आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, परंडा हे चार विधानसभा मतदारसंघ, तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांना 6 लाख 7 हजार 699 इतकी मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील यांना 3 लाख 73 हजार 374 इतकी मते मिळाली. मोदी लाटेत गायकवाड यांनी विक्रमी दोन लाख 34 हजार 325 मतांनी विजय मिळविला.

राज्याचे माजी गृहमंत्री राहिलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांचा हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसला जिव्हारी लागणारा ठरला. मात्र मोदी लाटेत राज्यातील अनेक दिग्गज नेते मंडळींचा पराभव झाल्याने चर्चा झाली नाही. यानंतर राष्ट्रवादीने स्थानिक सत्ता काबीज करण्यावर आणि पक्ष बांधणीवर चांगला भर दिला. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची स्तिथी पाहता यात सहा विधानसभा येतात. त्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक तीन आमदार, काँग्रेसचे दोन तर शिवसेनेचा एक आमदार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी आणि शिवसेना – भाजप अशी युती असली तरी या पक्षातील स्थानिकचे नेते कुरघोडीच्या राजकारणात एकमेकांचा पराभव करण्यात धन्यता मानत स्वतःचे सत्ता केंद्र शाबूत ठेवण्यासाठी हवे ते प्रयत्न करतात. लोकसभा निवडणूक जवळ आली असून आघाडी आणि युतीचा अद्याप ताळमेळ नसल्याने सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आणून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीकडून पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबातच उमेदवारी?

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत उस्मानाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे, तर भाजप-शिवसेना युतीत उस्मानाबाद लोकसभेची जागा शिवसेनेकडे आहे. मात्र अजून युती आणि आघाडीची अधिकृत घोषणा झालेली नाही. डॉ. पद्मसिंह पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे समीकरण असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळीही पद्मसिंह पाटील किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळणार असल्याचं चित्र आहे.

पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील हे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते राष्ट्रवादीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्षही आहेत. तर डॉ पाटील यांच्या सून अर्चनाताई पाटील या उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आहेत. त्यामुळे हा या परिवाराचा बालेकिल्ला आहे. डॉ पाटील यांच्यावर विरोधक राजकीय घराणेशाहीचा आरोप करीत असले तरी त्यांच्यामागे जनाधार असल्याने याचा परिणाम होताना दिसत नाही.

डॉ. पाटील परिवारातील सदस्यालाच उमेदवारीची संधी मिळणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे डॉ. पाटील यांच्या सूनबाई अर्चनाताई पाटील यांचे लोकसभा निवडणुकीसाठी नाव सर्वत्र चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे चांगले संघटन असले तरी राष्ट्रवादीला अतिआत्मविश्वास नडू शकतो. अर्चनाताई पाटील यांचा स्वभाव स्पष्टवक्तेपणा असल्यामुळे त्यांनी मनमोकळेपणे केलेल्या वक्तव्याचा विरोधकांना राजकीय फायदा होऊ शकतो. डॉ. पाटील यांनी लोकसभा उमेदवारीला नकार दिल्यास त्यांच्या परिवारातील कोणता सदस्य निवडला जातो याकडे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचीही तयारी सुरु

आघाडीची घोषणा न झाल्याने काँग्रेसनेही तयारी सुरु केली आहे. देशाचे माजी गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी स्वतः पत्रकार परिषदेत उल्लेख केला की काँग्रेस पक्षाने संधी दिली तर आपण लोकसभा लढवू. पाटील यांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादीचा कंपू हादरला असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नवे बळ मिळाले आहे. काँग्रेस पक्षाची मागील एक वर्षातील पक्ष संघटन बांधणी आणि दिशा पाटील यांच्या सूचक वक्तव्याला पूरक अशीच आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. तर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थात सत्ता आहे. मात्र काही ठिकाणी काँग्रेसला आलेली मरगळ पाहता काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज असल्याचं बोललं जातंय. शिवराज पाटील सोडता इतर कोणी काँग्रेसी नेता लोकसभेसाठी इच्छूक असलेला दिसत नाही.

भाजपकडून सुजितसिंग ठाकूर यांच्या नावाची चर्चा

गेल्या चार वर्षात झालेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात मोठं यश मिळवलंय. भाजपात सर्वपक्षाच्या नेत्यांनी प्रवेश केल्याने संघटनही वाढलं आहे. आमदार ठाकूर यांनी अनेक निवडणुकीत राजकीय चमत्कार दाखवत अनपेक्षितपणे विजयश्री खेचून आणला आहे. आमदार ठाकूर यांनी स्वतः लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं जाहीर भाषणात सांगितल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांना हुरूप आला असून त्यांची उमेदवारी शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. पंतप्रधान मोदी यांची क्रेझ अजूनही कायम असून यावेळीच्या निवडणुकीत भाजपने सर्व ताकत लावली आहे. ठाकूर यांचे नेतृत्व कौशल्य उत्कृष्ट असून इतर पक्षातील नेत्यांचे आणि त्यांचे घनिष्ट संबंध लोकसभेला कामी येऊ शकतात.

शिवसेनेकडून पुन्हा रवींद्र चव्हाणच

शिवसेनेकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना संधी मिळेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांची उमेदवारी कायम राहील असं वक्तव्य केलं होतं. शिवसेनेने एकला चलोरे चा नारा दिला असून पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करण्याची परंपरा शिवसेनेत असल्याने अंतर्गत गटबाजी हा चर्चेचा विषय ठरते.

शिवसेनेत सध्या उघडपणे गटबाजी दिसत असली तरी सेनेचा बालेकिल्ला राखण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. शिवसेनेने जिल्ह्याच्या पक्ष संघटना नेतृत्वात अनेक बदल केले असून यामुळे नाराजीचा सूर आहे. शिवसेनेत सध्या धनसत्ता आणि जनसत्ता / धन शक्ती विरुद्ध जनशक्ती असे दोन गट आहेत. त्यात स्थानिक नेते आणि निष्ठावान शिवसैनिक कोसो दूर आहेत. विद्यमान खासदार यांच्यावर नॉट रिचेबल असा आरोप स्वपक्षीय नेत्यांसह नागरिकातून वारंवार होतो.

खासदार गायकवाड यांचे मतदारसंघातील दर्शन सर्वसामान्यांना तसे दुर्मिळच आहे. उमरगा तालुका वगळता त्यांचा इतर ठिकाणी दौरा होताना दिसत नाही. निवडणूक जवळ आल्याने खासदार गायकवाड यांनी मतदारसंघात धावत्या दौऱ्याला आणि मॅरेथॉन बैठकांना सुरुवात करत विकासकामांच्या उद्घाटनांचा सपाटा लावला आहे. सर्वसामान्य नागरिकात आणि शिवसैनिकांत सहज मिसळणारा खासदार अशी ओळख असलेल्या खासदार गायकवाड यांच्या पाठीशी निष्ठावान शिवसैनिकांचा मोठा गट आहे.

इतर पक्षांची परिस्थिती काय?

प्रमुख पक्षसोबत आम आदमी पार्टी, बहुजन विकास आघाडी, शेतकरी संघटनांसह इतर प्रादेशिक पक्ष लोकसभेसाठी उमेदवार रिंगणात उतरवू शकतात. शिक्षण सामाजिक क्षेत्रात कार्य असलेले डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यासह देवदत्त मोरे या युवा नेत्यांचे संघटन मोठे असून राजकीय वारसा नसलेली ही मंडळी लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांनी राजकीय पक्षाची निवड गुप्त ठेवत जनसंपर्क वाढवला आहे.

निवडणुकीतील स्थानिक मुद्दे

उस्मानाबाद लोकसभेसाठी स्थानिक मुद्दे म्हणावे तितके चर्चेला येत नाहीत. सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद रेल्वे सुरु करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळजापूर येथील भाषणात केल्याने यंदा हा विषय राजकीय मुद्दा ठरू शकतो. सोलापूर – तुळजापूर रेल्वेसाठी सध्या प्रयत्न होताना दिसत असून रेल्वे मंत्री यांनी या मार्गासाठी तरतूद देखील केली आहे. भाजप शिवसेना सत्तेत असल्याने त्यांना दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, नोटाबंदीने झालेला त्रास , वाढती महागाई या सर्व मुद्यांचा फटका बसू शकतो. मराठा आरक्षण तर मिळालंय, पण धनगर आरक्षणाबाबत काही निर्णय झाला नाही. त्यामुळे जातीय समीकरणे राजकीय गणित बिघडवू शकतात. उस्मानाबाद लोकसभा निवडणुका जवळ आल्याने पक्षीय कार्यकर्त्यांत सोशल मीडियावर आतापासूनच वॉर रंगले असून आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

चर्चेतले उमेदवार आणि आरोप

डॉ. पद्मसिंह पाटील – राज्याचे माजी मंत्री राहिलेले डॉ. पद्मसिंह पाटील हे त्यांचे चुलत बंधू पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी या दुहेरी हत्याकांडात आरोपी आहेत. त्यांना सीबीआयने या प्रकरणात अटक केली होती. डॉ. पाटील सध्या जामिनावर बाहेर असून हे हत्याकांड प्रकरण न्यायालयात सुनावणी सुरू आहे. स्थानिक निवडणुकीत हा मुद्दा चर्चेचा आणि कळीचा ठरतो. हे हत्याकांड देशभर गाजलं होतं.

रवींद्र गायकवाड – आवश्यक सुविधा न दिल्याने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला कानशीलात मारल्यानंतर खासदार गायकवाड देशात चर्चेला आले होते. या घटनेनंतर विमान कंपन्यांनी अनेक नियमात सुधारणा केली.

2014 ची राजकीय स्थिती  

विजयी उमेदवार – प्रा रवींद्र गायकवाड (शिवसेना)

पराभूत उमेदवार – डॉ. पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी)

यात 6 विधानसभा मतदार संघ येतात त्याची 2014 ची स्थिती

239 औसा – जिल्हा लातूर ( आमदार बसवराज पाटील, काँग्रेस )

240 उमरगा – जिल्हा उस्मानाबाद (आमदार ज्ञानराज चौघुले, शिवसेना )

241 तुळजापूर – जिल्हा उस्मानाबाद ( आमदार मधुकरराव चव्हाण, काँग्रेस )

242 उस्मानाबाद ( आमदार राणा जगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी )

243 परंडा  – जिल्हा उस्मानाबाद ( आमदार राहुल मोटे, राष्ट्रवादी )

246 बार्शी जिल्हा सोलापूर ( आमदार दिलीप सोपल , राष्ट्रवादी )

संबंधित बातमीमाढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.