मुंबई उत्तर मध्य लोकसभा : युती न झाल्यास पूनम महाजनांना मोठा फटका
मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात या वेळी कोण निवडून येणार याची उत्सुकता तर सर्वांना आहेच, पण त्याचसोबत कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळणार याची देखील तेवढीच उत्सुकता आहे. खास करून काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात या वेळी कोण निवडून येणार याची उत्सुकता तर सर्वांना आहेच, पण त्याचसोबत कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळणार याची देखील तेवढीच उत्सुकता आहे. खास करून काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याचं उघडपणे जाहीर केल्यानंतर आता इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, ज्याला एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटलं जायचं. या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्ता 2005 पासून निवडून येत होत्या. पण 2014 ला आलेल्या मोदी लाटेत भाजपच्या पूनम महाजन येथून निवडून आल्या.
या मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा आहेत. ज्यापैकी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कुर्ला, कलिना आणि वांद्रे पूर्व इथे शिवसेनेचे आमदार निवडून आले. तर विले पार्ले आणि वांद्रे पश्चिम इथे भाजप आमदार निवडून आले. चांदीवलीची एकमेव जागा काँग्रेसच्या खात्यात पडली होती. पण आता मोदी लाट ओसारलीये, त्यात छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील विजयामुळे काँग्रेसचा उत्साह वाढलाय.
प्रिया दत्त यांनी आपण लोकसभा निवडणुक लढणार नसल्याचं घोषित केल्याने नागमा, राज बब्बर आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. उत्तर मध्य मुंबईत 24 टक्के मतदार हा मस्लीम आणि ख्रिश्चन अल्पसंख्याक यांचा आहे. तर मराठी भाषिक मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यामुळे शिवसेनेचे तीन आमदार इथून निवडूनही आलेत. भाजपकडून भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा आणि विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं नाव वगळलं जाईल अशी चर्चा जरी असली तरी शिवसेना-भाजप युती झाली नाही तर भाजपकडे पूनम महाजम यांना वगळता दुसरा तगडा उमेदवार सध्यातरी पक्षात नाही. त्यामुळे काँग्रेसच्या स्टार उमेदवाराविरोधात भाजप सचिन तेंडुलकरच्या रूपाने स्टार उमेदवार चाचपडून पाहत असली तरी भाजपला त्यात फार यश आलेलं नाही.
या मतदारसंघातलं गणित युतीवर अवलंबून असेल. मतदारसंघात अनेक स्थानिक मुद्दे आहेत. विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याकडे युवा मोर्चाची जबाबदारी आहे. त्यामुळे युवा वर्गापर्यंत पोहोचण्यास त्यांना मदत झाली आहे. शिवाय दिग्गज नेते प्रमोद महाजन यांची त्या कन्या आहेत. मोदी लाटेत त्यांचा विजय झाला. पण यावेळी युती न झाल्यास पूनम महाजनांना संघर्ष करावा लागणार आहे. कारण, मराठी मतांच्या विभाजनाचा फायदा थेट काँग्रेसला होईल.