पुणे लोकसभा : आघाडीची तयारी, भाजप पिछाडीवर असल्याचं चित्र
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरु आहे. कोण कुठून निवडणूक लढवणार हे स्पष्ट नसलं तरी निवडणुकीची रणधुमाळी मात्र सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. अवघ्या काही महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असल्याचं जवळजवळ स्पष्ट झालेलं असलं तरी पुण्याची […]
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरु आहे. कोण कुठून निवडणूक लढवणार हे स्पष्ट नसलं तरी निवडणुकीची रणधुमाळी मात्र सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. अवघ्या काही महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असल्याचं जवळजवळ स्पष्ट झालेलं असलं तरी पुण्याची जागा या आघाडीत बिघाडी निर्माण करू शकते. पुणे लोकसभा मतदारसंघ तसा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. 2014 ला येथून विश्वजित कदम यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.
एकीकडे वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी आघाडीच्या गणितांची जुळवाजुळव सुरू आहे. पुणे जिल्ह्यात लोकसभेचे साडेतीन मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये पुण्यातून भाजपचे अनिल शिरोळे निवडून आले. त्यांना अनुक्रमे – पुण्यातील विधानसभेच्या सर्व सहाही मतदारसंघात भाजपाला मताधिक्य मिळालं होतं. पुणे लोकसभा मतदासंघातून काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांचा पराभव झाला. राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोपामुळे तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. या उलट भाजपकडून अखेरच्या क्षणी अनिल शिरोळे यांची उमेदवारी जाहीर झाली. ते मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. त्यांतर महापालिकेतही भाजपची सत्ता आली.
2014 मधील उमेदवार आणि मते
उमेदवार पक्ष मिळालेली मते
अनिल शिरोळे भाजप 3,96,136 (विजय)
विश्वजीत कदम काँग्रेस 1,81,146
दिपक पायगुडे मनसे 65,179
मतदानाची टक्केवारी 58.50%
विधानसभा मतदारसंघांचं चित्र
शिवाजी नगर – भाजप
कोथरूड – भाजप
पर्वती – भाजप
कसबा – भाजप
कँटोन्मेंट – भाजप
वडगाव शेरी – भाजप
पुण्यात विरोधकांकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने भाजप पकड कायम ठेवण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी विधानसभेला भाजप, शिवसेना स्वतंत्र लढले होते. यावेळी पुणे शहरातील कोथरूड वगळता शिवसेनेच्या परिस्थितीत फार सुधारणा नाही. काँग्रेस – राष्ट्रवादीची आघाडी सर्वच ठिकाणी मोठं आव्हान उभं करणार आहे. त्यामुळे भाजपलाही अवघड जाणार आहे.
भाजपाकडे गिरीश बापट, संजय काकडे, अनिल शिरोळे, प्रकाश जावडेकर, अमर साबळे, संजय (बाळा) भेगडे, मेधा कुलकर्णी, योगेश गोगावले असे नेते आहेत. तर शिवसेनेकडे नीलम गोऱ्हे, चंद्रकांत मोकाटे , विजय शिवतारे असे मर्यादित प्रभाव असेलेले नेते आहेत.
एकूणच विचार करता पुणे जिल्ह्यात काँग्रेस – राष्ट्रवादीला अच्छे दिन अपेक्षित आहेत. भाजपची परिस्थिती थोड्या बहुत फरकाने सारखीच राहणार आहे. शिवसेनेची चिंता मात्र वाढणार आहे.
संभाव्य उमेदवार
काँग्रेस – मोहन जोशी, आंनद गाडगीळ
राष्ट्रवादी – वंदना चव्हाण, अण्णा थोरात, चेतन तुपे
भाजप – संजय काकडे, गिरीश बापट, प्रकाश जावडेकर, अनिल शिरोळे
शिवसेना – नीलम गोऱ्हे, अमोल कोल्हे, संजय भोसले
मनसे – दीपक पायगुडे, रुपाली पाटील, अनिल शिदोरे
संबंधित बातमी :