सातारा लोकसभा : राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध, तरीही राजे साताऱ्यातून लढणारच!

सातारा : लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. या सर्वांमध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय असतो तो म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ. कारण, हा उदयराजेंचा मतदारसंघ आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे खासदार आहेत. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले […]

सातारा लोकसभा : राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध, तरीही राजे साताऱ्यातून लढणारच!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

सातारा : लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. या सर्वांमध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय असतो तो म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ. कारण, हा उदयराजेंचा मतदारसंघ आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे खासदार आहेत. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना 5 लाख 22 हजार मते मिळाली होती. तर भाजप, शिवसेना आणि आरपीआय या आघाडीने ही जागा आरपीआयला बहाल केली होती. त्यांनी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांना नावापुरते उभं करण्यात आलं. त्यांना 71 हजार मते मिळाली होती.

2009 मध्ये उदयनराजे यांना टक्कर देणारे भाजपचे उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना 2014  मध्ये अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती. त्यांना 1 लाख 56 हजार मते मिळाली होती. 2009 मध्ये त्यांना 2 लाख 35 हजार मते मिळाली होती. आपचे उमेदवार राजेंद्र चोरगे यांना 82 हजार मतदान झालं. या उमेदवारांसह 2014 च्या निवडणुकीत अजून 12 अपक्षांनी आपलं नशीब आजमावलं होतं.

लोकसभा 2019 साठी इच्छुक कोण? (प्रत्येक पक्षाकडून)

राष्ट्रवादीतून सध्या विद्यमान खा. उदयनराजे भोसले, सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे इच्छुक आहेत. तर भाजपकडून पुरुषोत्तम जाधव हे इच्छुक आहेत.

उदयनराजेंना टक्कर देऊ शकणारे प्रमुख विरोधक कोण?

कोणत्याही व्यक्तीला आपलंसं करण्याचं मोठ कौशल्य उदयनराजेंमध्ये आहे. जात धर्म न मानता सर्व सामान्य लोकांना एकत्र घेऊन जाणार व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सामान्यातल्या सामान्य माणूस जलमंदिर पॅलेसला शासकीय अथवा कोणतीही तक्रार घेऊन गेला तर त्याला तात्काळ न्यायनिवाड्याचं करण्याचं काम उदयनराजे करतात.

या गोष्टींसोबतच उदयनराजेंच्या काही नकारात्मक बाजूही आहेत. कोणत्याही गोष्टीवर पटकण रिअॅक्ट होणे, कार्यकर्ता अथवा सामान्य व्यक्तीच्या सांगण्यावरुन माहिती न घेता समोरच्या व्यक्तीवर अचानक अॅग्रेसीव होणे ही त्यांची नकारात्मक बाजू आहे.

भाजपचे इच्छुक उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांचे सकारात्मक आणि नकारात्मक मुद्दे

पुरुषोत्तम जाधव हे जनकल्याण प्रतिष्ठाणच्या माध्यमातून अनेक ठिकाणी विकासात्मक कामे करत आहेत. जनसामान्यांपर्यंत पोहोचून लोकांचे प्रश्न सोडविण्याचं काम ते करत आहेत. क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचं नाव चांगल्या पटलावर नेण्याचं काम त्यांच्याकडून सुरु आहे.

दुसरीकडे पुरुषोत्तम जाधव यांचा जिल्ह्यातला जनसंपर्क म्हणावा तेवढा भक्कम नाही. भाजप पक्षाची ताकत नाही. त्यामुळे दोन लोकसभेत अपयश आलं आहे.

युतीचा फरक काय?

साताऱ्यात भाजप-शिवसेनेची युती झाली तरी राष्ट्रवादीचे विद्यमान खा. उदयनराजे भोसले यांचेच पारडे जड असेल. पण उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीतून अंतर्गत विरोध असल्याने त्याचा फायदा युतीला होऊ शकतो. युती झाली नाही तर त्याचा फायदा उदयनराजे भोसले यांनाच होईल.

आघाडीला बहुजन वंचित आघाडीने पाठिंबा दिला तर काय होईल?

साताऱ्यात डॉ. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम हे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेले तर आघाडीला त्याचा फायदाच होईल. पण उदयनराजे भोसले यांनी अनेक वेळा अनुसूचित जाती-जमातीच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे उदयनराजेंना जास्त मदत होणार नाही.

पक्षांतर्गत राजकीय गणितं

उदयनराजे भोसले हे दोन वेळा राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. साताऱ्यातील एक प्रभावी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा बोलण्याचा आणि वागण्याच्या स्टाईलमुळे त्यांचा एक वेगळाच चाहता वर्ग निर्माण झाला आहे. पण असे असले तरी राष्ट्रवादी पक्षाविरोधात बोलणे, पक्ष बांधणी आणि पक्षवाढीसाठी काम न करणे आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील नेत्यांच्या विरोधात बोलणे, जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पक्ष विरोधी भूमिका घेणे या कारणांनी यावेळी मात्र त्यांना जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे काही आमदार तिकीट देण्याबाबत विरोध करत आहेत. उदयनरजे यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे आणि आ. बाळासाहेब पाटील यांचा उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध आहे. मात्र असे असले तरी पक्ष प्रमुख शरद पवार हे मात्र उदयनराजे यांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत.

दुसरीकडे उदयनराजे हे भाजपाशीही जवळीक ठेवून आहेत. पण मतांचे राजकारण पाहता उदयनराजे मात्र राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. कारण सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. उदयनराजे भोसले यांना पर्याय म्हणून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर  यांच्याकडे पाहिले जाते. उदयनराजे यांना राष्ट्रवादी उमेदवारी देते का यावर  भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार ठरेल, पण भाजपकडून पुरुषोत्तम जाधव सध्या इच्छुक असून त्यांनी तशी तयारी सुरु केली आहे.

निवडणुकीत महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील?

सध्या मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन होणाऱ्या राजकारणामुळे राजे सक्रिय आहेत. या भूमिकेबाबत जनसामान्यातून राजेंबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. निवडणुकीत या मुद्द्यांचा मोठा फायदा राजेंना होऊ शकतो. जाहिरनाम्यातील विकासकामे, तसेच जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचे प्रलंबित काम, अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे प्रलंबित असणाऱ्या कामाचा मुद्दा, जिल्ह्यातील पाणी प्रश्न आणि विकास कामे या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाईल.

सातारा लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे पाच मुद्दे

सातारा जिल्ह्यात अनेक धरणे झाली, पण या धरणांमुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पूर्ण पुनर्वसन झालेले नाही. हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे या धरणग्रस्तांचे नेते आणि धरणग्रस्त या बाबत काय भूमिका घेतील हे सांगता येणार नाही.

सातारा जिल्ह्यातील अनेक तालुके हे दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर झाले आहेत. या आधी माण, खटाव हे दोनच तालुके दुष्काळी तालुके म्हणून गणले जायचे. पण यावर्षी खटाव तालुक्याला यातून वगळण्यात आले. त्यामुळे या तालुक्याचा लोकप्रतिनिधींवर रोष आहे. आता जिल्ह्यातील कराड उत्तर, कोरेगाव, खंडाळा ,फलटणचा काही भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला आहे. त्यामुळे दुष्काळ हा देखील महत्वाचा विषय होऊन बसला आहे. पण याचा मतदानावर काय परिणाम होईल हे आत्ता सांगता येणार नाही.

सातारा शहराच्या जवळच दोन मोठमोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. पण या औद्योगिक वसाहतीमधल्या मोठ्या कंपन्या बंद पडल्या आहेत. तर हळूहळू 50 टक्के कंपन्या या बंद पडल्या आहेत. त्यामुळे तरुण बेरोजगारांना काम नाही. तरुण शहर सोडून पुणे, मुंबई या ठिकाणी कामाच्या शोधात आहेत.

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाचगणी, कास, ठोसेघर यांसारखी अनेक पर्यटनस्थळे आहेत. पण या पर्यटनस्थळांच्या विकासाबाबत लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. या पर्यटनस्थळांच्या बाबतीत अनेक समस्या आहेत. पर्यटनस्थळांच्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी पर्यटन होऊ शकते पण त्या बाबत काहीही केले जात नाही.

जिल्ह्यातील अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. तर दुर्गम भागात अजून रस्ते झालेच नाहीत. त्यामुळे दुर्गम भागात दळणवळणाचे साहित्य पोहोचू शकलेले नाही. दुर्गम भागात राहणाऱ्या या लोकांच्या समस्याकडे तर कोणीही लक्ष देत नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर काय झालं?

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचंच वर्चस्व राहिलेलं आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या 8 जागांपैकी 5 जागांवर राष्ट्रवादी, 2 जागांवर काँग्रेस आणि एका जागावर शिवसेना विजयी झाली. सातारा, फलटण, कराड उत्तर, वाई आणि कोरेगाव या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विजयी झाली, तर कराड दक्षिण आणि माण या दोन मतदारसंघात काँग्रेस विजयी झाली. पाटण या मतदारसंघात शिवसेनेला यश मिळालं.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीतही पाच ठिकाणी राष्ट्रवादी, तर दोन ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेसने यश मिळवलं. वाई आणि कराडमध्ये भाजपने मुसंडी मारत या ठिकाणी वर्चस्व मिळवलं.

विधानसभा मतदारसंघांमधील पक्षनिहाय आमदार

सातारा जिल्ह्यात एकूण आठ मतदारसंघ आहेत. सातारा लोकसभेमध्ये यापैकी सहा, तर माढा लोकसभा मतदारसंघात दोन (फलटण आणि माण) मतदारसंघ जातात.

कराड दक्षिण विधानसभा- पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)

कराड उत्तर विधानसभा- बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)

कोरेगाव विधानसभा – शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी)

सातारा विधानसभा – शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी)

पाटण विधानसभा- शंभूराजे देसाई (शिवसेना)

वाई विधानसभा – मकरंद जाधव (राष्ट्रवादी)

माढा लोकसभेतील विधानसभा मतदारसंघ

फलटण विधानसभा  – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)

माण विधानसभा – जयकुमार गोरे (काँग्रेस)

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.