शिरुर लोकसभा : यावेळीही शिवाजी आढळराव पाटलांना तोडीस तोड प्रतिस्पर्धी नाही?

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यातल्या 48 मतदारसंघांचा आढावा घेत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी, हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सध्या इथे शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील खासदार आहेत. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लढत […]

शिरुर लोकसभा : यावेळीही शिवाजी आढळराव पाटलांना तोडीस तोड प्रतिस्पर्धी नाही?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यातल्या 48 मतदारसंघांचा आढावा घेत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी, हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सध्या इथे शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील खासदार आहेत. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ

2014 मध्ये निवडून आलेले खासदार – शिवाजी आढळराव-पाटील

पक्ष -शिवसेना

प्रमुख विरोधक

देवदत्त निकम (राष्ट्रवादी काँग्रेस)

महेश लांडगे (संलग्न भाजप अपक्ष आमदार)

(शरद पवार यांचे नातू पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनाही शिरूर मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे)

शिरूर लोकसभा मदरसंघातील आमदार संख्या – 6

जुन्नर– शरद सोनवणे (मनसे)

आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

खेड-आळंदी – सुरेश गोरे (शिवसेना)

शिरूर – बाबुराव पाचर्णे (भाजप)

भोसरी – महेश लांडगे (अपक्ष आमदार संलग्न भाजप )

हडपसर – योगेश टिळेकर (भाजप)

2019 च्या निवडणुकीतील प्रभावी मुद्दे

शिरूर लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये जिव्हाळ्याची बैलगाडा शर्यत 2014 च्या निवडणुकीतील आश्वासने देऊनही अद्याप सुरू न झाल्याने या मुद्द्यावरून 2019 ला सर्वच पक्षांना फटका बसू शकतो.

पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण-राजगुरूनगर शहरातील वाहतूक कोंडी तसेच पुणे-अहमदनगर महार्गांवरील वाघोली शिक्रापूर येथील सततची वाहतूक कोंडी हा महत्त्वाचा विषय आहे.

रखडलेली पुणे-नाशिक रेल्वे हा मुद्दा संतापाचा विषय बनलाय. भौगोलिक कारणांमुळे हा मार्ग रखडलाय.

खेड तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदरला गेल्याने स्थानिकांचा रोजगार गेला हा विषय प्रभावी ठरणार आहे. या सर्व मुद्द्यांवरून विद्यमान खासदारांवर इतर पक्षाचे उमेदवार चांगलीच टीका करणार आहेत. भौगोलिक कारणांमुळेच हे विमानतळ पुरंदरला गेलंय. विमानतळ प्राधिकरणाच्या अहवालानंतर हे विमानतळ पुरंदरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील आकडेवारी, युती/आघाडी

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील आहेत. शिवाजी आढळराव पाटील हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. शिवाजी आढळराव पाटील हे शिवसेना भाजप पक्षाच्या युतीतून निवडून आलेले खासदार आहेत. 2004 साली खेड लोकसभेचे खासदार म्हणून शिवाजी आढळराव पाटील हे पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 2009 साली नव्याने स्थापन झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार आणि त्यांच्या कारकीर्दीतले दुसरे खासदार म्हणून ते निवडून आले. त्यानंतर 2014 साली पुन्हा एकदा शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात आपला विजय मिळवत सलग तीन वेळा खासदार होऊन हॅट्ट्रिक केली.

2014 साली शिरूर लोकसभा मतदारसंघात खरी लढत झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकम आणि शिवसेना उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यात. या निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना 6 लाख 43 हजार 415 मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांना 3 लाख 41 हजार 601 मते मिळाली. या निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तब्बल 301814 मतांनी दारून पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

2014 लोकसभा निवडणुकीतील मतदान

शिवाजी आढळराव पाटील यांना (शिवसेना)

एकून मिळालेली मते – 643415 (59.51%)

देवदत्त निकम (राष्ट्रवादी काँग्रेस)

एकूण मिळालेली मते – 341601 (31.35%)

अशोक खांडेभराड (मनसे)

एकूण मिळालेली मते – 36448 (3.35%)

सर्जेराव वाघमारे (बसपा)

एकूण मिळालेली मते – 19783 (1.82 %)

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतरचं चित्र?

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला चांगलं यश मिळालं. जुन्नर विधानसभा मतदारसंघावरती मनसेने आपला झेंडा फडकवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघ मनसेने आपल्या कडे खेचला. तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवत दिलीप वळसे पाटील यांनी यश मिळवलं.

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेने आपला झेंडा फडकवला. सुरेश गोरे यांनी या ठिकाणी विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघावरती आपली सत्ता मिळवली. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघावरती भाजपने वर्चस्व मिळवलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघावरती भाजपचे बाबुराव पाचर्णे यांनी विजय मिळवला. तर हडपसर विधानसभा मतदारसंघावरती भाजपचे योगेश टिळेकर यांनी विजय मिळवत शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघ आपल्याकडे खेचला. भोसरी विधानसभा मतदारसंघावरती अपक्ष महेश लांडगे यांनी विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघ हिसकावला.

या नंतर झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत शिरूरमध्ये शिरूर शहर विकास आघाडीने (काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना) यांनी एकत्रीत येऊन भाजपचा पराभव केला. तर जुन्नर आणि चाकण नगर परिषदेवरती शिवसेनेने यश मिळवत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केला.

या नंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि भाजपचा पराभव करत निर्विवाद वर्चस्व मिळवलं. स्थानिक स्वराज्य संस्था बाजार समिती खरेदी विक्री संघ यांच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवत भाजप-शिवसेनेचा पराभव केला.

सध्या कोण कुणाकडून इच्छुक?

शिवसेनेकडून विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील हे उमेद्वार असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदीप कंद, देवदत्त निकम हे इच्छुक आहेत. पण ऐनवेळी  दुसऱ्याच उमेद्वाराला संधी दिली जाण्याची जास्त शक्यता आहे. भाजपकडून भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे हे इच्छुक आहेत, तर जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल इच्छुक आहेत.

शिवसेना-भाजप युतीचा परिणाम

2019 साठी युती होऊ किंवा नाही, विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटलांना एवढा फरक पडेल असं दिसत नाही. कारण, शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यात भाजपचा प्रभाव कमी आहे. त्यामुळे शिवसेनेला याचा मोठ्या प्रमाणात फरक पडेल असे दिसत नाही. तर दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना शह देईल असा इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही.

राष्ट्रवादीकडून आमदार दिलीप वळसे पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली तर आढळराव पाटील आणि वळसे पाटील यांच्यात कांटे की टक्कर होऊ शकते. दुसरीकडे शिवसेना-भाजप युती झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांना भाजपमधून आपल्याकडे खेचून लोकसभेची उमेदवारी दिली तर लांडगे आणि आढळराव यांच्यात अटीतटीची लढत होऊ शकते.

भारिप, एमआयएम काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेले तर काय फरक पडेल?

प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची एमआयएम काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत गेली तर याचा काँग्रेस राष्ट्रवादीला चांगलाच फायदा होईल. कारण याच मतदारसंघात झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचारामुळे आंबेडकरी जनता कुठे तरी सरकार वरती नाराज आहे. तर मुस्लीम मतदार हे आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारवरती नाराज आहेत आणि त्यांचे मतदान हे काँग्रेस राष्ट्रवादीला मिळेल. या मुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे मताधिक्य चांगलेच वाढेल असं चित्र आहे.

पक्षांतर्गत राजकीय गणितं

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना पर्याय नाही. कारण शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधासभा मतदारसंघात तळागळापर्यंत पोहोचलेले नाव आहे. त्यांना मतदारसंघाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेतून सध्या तरी कोणाचाच विरोध नाही. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेचा उमेदवारच अद्याप ठरलेला नाही. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्यांला कोणी विरोध करेल असे सध्या तरी दिसत नाही. कारण, आढळराव पाटलांना रोखू शकेल असा इच्छुक उमेदवारांपैकी तुल्यबळ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही.

संबंधित बातम्या :

वाशिम-यवतमाळ लोकसभा : पाचव्यांदा निवडून येण्यासाठी भावना गवळींचा मार्ग खडतर

हातकणंगले लोकसभा : 2014 ला एनडीए, 2019 ला राजू शेट्टींच्या खांद्यावर यूपीएचा झेंडा?

पालघर लोकसभा : पुन्हा एकदा वनगांच्या मुलाविरोधात भाजपचा उमेदवार? 

परभणी लोकसभा : अंतर्गत नाराजीने शिवसेनेला बालेकिल्ल्यातच भगदाड

कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!

रायगड लोकसभा : तटकरेंच्या घराणेशाहीला कंटाळलेले नेतेच राष्ट्रवादीला दगा देणार?

हिंगोली लोकसभा : मोदी लाटेतही निवडून येणाऱ्या राजीव सातवांचा मार्ग खडतर

नागपूर लोकसभा: संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, गडकरींसमोरील आव्हानं काय?

उस्मानाबाद लोकसभा : राष्ट्रवादी जिव्हारी लागलेल्या पराभवाचा बदला घेणार?

माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.