Baramati Lok sabha result 2019 : बारामती लोकसभा मतदारसंघ निकाल

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपच्या कांचन कूल यांचा पराभव केला. बारामती लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान झालं. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपकडून कांचन कूल यांच्यात लढत झाली.बारामतीची जागा जिंकायचीच असा निर्धार करत भाजपनं प्रचंड मोठी यंत्रणा बारामती मतदारसंघात कामाला लावत राष्ट्रवादीला पर्यायानं […]

Baramati Lok sabha result 2019 : बारामती लोकसभा मतदारसंघ निकाल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपच्या कांचन कूल यांचा पराभव केला. बारामती लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान झालं. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपकडून कांचन कूल यांच्यात लढत झाली.बारामतीची जागा जिंकायचीच असा निर्धार करत भाजपनं प्रचंड मोठी यंत्रणा बारामती मतदारसंघात कामाला लावत राष्ट्रवादीला पर्यायानं पवार कुटुंबाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मागील निवडणुकीत मोदी लाट असताना सुप्रिया सुळे यांना 70 हजाराचं मताधिक्य मिळालं होतं. या निवडणुकीत मात्र संपूर्ण मतदारसंघात विशिष्ट यंत्रणा राबवत भाजपच्या देश आणि राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा या माध्यमातून पवार कुटुंबीयांविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. त्याचवेळी राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार आणि अन्य नेत्यांनी खिंड लढवत भाजपच्या नाकर्तेपणावर हल्ला चढवला. विशेषत: भाजपकडून बारामतीची जागा अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली.

बारामती लोकसभा मतदारसंघ

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाकांचन कुल (भाजप)पराभूत
काँग्रेस/ राष्ट्रवादीसुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)विजयी
अपक्ष/इतरनवनाथ पडळकर (VBA)पराभूत

बारामती म्हटलं की शरद पवार यांचं नाव घेतलं जातं. गेल्या पन्नासहून अधिक वर्षे या मतदारसंघावर शरद पवार यांचा दबदबा राहिला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट, धनगर आरक्षणाचा मुद्दा असतानाही सुप्रिया सुळे या 70 हजारांच्या मताधिक्यानं निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामती, इंदापूर, पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळून त्यांनी महादेव जानकर यांचा पराभव झाला होता. तर जानकर यांना अनपेक्षितपणे दौंड, खडकवासला या विधानसभा मतदारसंघामधून आघाडी मिळाली होती. 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार कोण याबाबतच अनेक दिवस शिक्कामोर्तब होत नव्हतं. तत्पूर्वीच सुप्रिया सुळे यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. भाजपकडून ऐनवेळी पवारांच्या नातेवाईक असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली.

विशेष म्हणजे, या मतदारसंघातून दुग्धविकासमंत्री महादेव जानकर हे स्वत: निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना कमळ या चिन्हावर लढण्याची अट घालण्यात आली. जानकर यांना ही निवडणूक स्वत:च्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लढायची असल्यानं त्यांनी शेवटपर्यंत बारामतीसाठी प्रयत्न केले. मात्र भाजपकडून त्यांच्या उमेदवारीबाबत विचार केला गेला नाही. उलट त्यांच्याच पक्षातील एकमेव आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आली. पुण्यात झालेल्या भाजप मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीची जागा जिंकायचीच असा निर्धार केला होता. त्यामुळे कांचन कुल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून मोठी यंत्रणा या मतदारसंघात उतरवण्यात आली. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर बारामतीतच ठिय्या मांडला.

इतकंच नव्हे तर अमित शहा, नितीन गडकरी, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत आदी नेत्यांच्या सभाही या मतदारसंघात घेण्यात आल्या. पवार कुटुंबीयांना लक्ष्य करत या सर्वच नेत्यांनी मतदारांना परिवर्तनासाठी साद घातली. मागील निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना मताधिक्य मिळालं, त्या ठिकाणीही विशेष यंत्रणा राबवून मताधिक्य घटवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. एकूणच पवार कुटुंबीयांना पर्यायाने राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न भाजपकडून करण्यात आले.

दुसरीकडे भाजप सरकारबद्दल लोकांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा व्हावा यासाठी राष्ट्रवादीकडून विशेष प्रयत्न केले गेले. मागील निवडणुकीतील धनगर आरक्षणाचा मुद्दा, शेतकर्‍यांचे प्रश्न, सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या समस्या आदी मुद्दे घेत राष्ट्रवादीने भाजप सरकारवर हल्लाबोल केला. मागील निवडणुकीत कमी झालेलं मताधिक्य लक्षात घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीपूर्वीच विविध भागांमध्ये दौरे करत मतदारांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या. त्याचवेळी इंदापूर, पुरंदर आणि भोर या काँग्रेसची ताकद असलेल्या मतदारसंघातील नेत्यांशी असलेले मतभेदही संपवण्यात आले. त्यामुळं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपटे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात आघाडी घेतली.

बारामती लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत 21 लाख 12 हजार 408    मतदारांपैकी 12 लाख 99 हजार 792 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मागील निवडणुकीत 58.83 टक्के मतदान झालं होतं, त्या तुलनेत यावेळी 61.53 टक्के इतकं मतदान झालं. विशेष म्हणजे यावर्षी मतदारांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार याबाबत सुरुवातीपासून तर्कवितर्क लढवले जात आहेत. दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपनं प्रचंड यंत्रणा राबवली. त्यांच्याकडून पवारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आलं. कोणत्याही परिस्थितीत पवारांच्या अभेद्य गडाला छेद द्यायचाच ही भूमिका भाजपची राहिली. त्याचवेळी राष्ट्रवादीनं मात्र संयम ठेवत विकासासह भाजपच्या चुकीच्या धोरणांवर आवाज उठवला. त्यामुळं आता बारामती लोकसभा निवडणुकीत मतदार कोणाला कौल देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.

विधानसभा  एकूण मतदार      झालेले मतदान       टक्केवारी  बारामती         339218               238283                  70.24 दौंड                295611               189216                     64.01 इंदापूर            302180              194572                    64.39 पुरंदर             347857              210396                    60.48 भोर                354577             215719                     60.84 खडकवासला     472965        251606                     53.20 एकूण              2112408      1299792               61.53

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.