Bhandara-Gondia Lok sabha Result : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 60.50 टक्के मतदानाची नोंद झाली. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपने सुनील मेंढे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली. 2014 साली या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर नाना पटोले लढून जिंकले होते. पुढे त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला […]
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 60.50 टक्के मतदानाची नोंद झाली. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपने सुनील मेंढे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली. 2014 साली या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर नाना पटोले लढून जिंकले होते. पुढे त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि यंदा नागपुरातून नितीन गडकरींविरोधात लढत दिली. नाना पटोलेंनी भाजप सोडल्याने इथे पोटनिवडणूक झाली. त्यावेळी तिथे राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांचा विजय झाला. मात्र यंदा राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं नाही. त्यामुळे भंडारा-गोंदियात यंदा कोण बाजी मारणार याची उत्सुकता मतदानापासून होती. अखेर भाजपच्या सुनील मेंढे यांनी बाजी मारली.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | सुनील मेंढे (भाजप) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी | पराभूत |
अपक्ष/इतर | एन. के. नान्हे (VBA) | पराभूत |