Dindori Lok sabha result 2019 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निकाल
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या भारती पवार यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीचे धनराज महाले यांचा पराभव केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात मतदान झाले. इथे यंदा 64 टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या 2014 मध्ये या मतदारसंघात 63. 40 टक्के इतके मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये 0.60 इतकी […]
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या भारती पवार यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीचे धनराज महाले यांचा पराभव केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात मतदान झाले. इथे यंदा 64 टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या 2014 मध्ये या मतदारसंघात 63. 40 टक्के इतके मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये 0.60 इतकी मतदानाची वाढ झाल्याचे दिसून आले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते .मात्र भाजप-सेना महायुतीकडून डॉक्टर भारती पवार, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून धनराज महाले तर माकपकडून जे पी गावित या प्रमुख उमेदवारात लढत झाल्याने या मतदार संघात तिरंगी लढत बघायला मिळाली.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | डॉ. भारती पवार (भाजप) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | धनराज महाले (राष्ट्रवादी) | पराभूत |
अपक्ष/इतर | बापू केळू बर्डे (VBA) | पराभूत |
या मतदार संघात एकूण 15 लाख दोन हजार 35 मतदार आहेत. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यात दिंडोरी, कळवण-सुरगाणा, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड या मतदारसंघाचा समावेश असून येथे माकपचा 1, भाजपाचा 1, शिवसेनेचा 1 आणि राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून आले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात येण्यापूर्वी हा मतदारसंघ मालेगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. 2009 मध्ये मतदार संघाची पुनर्रचना झाली. आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने हा मतदारसंघ आदिवासी मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला. 2014 मध्ये असलेल्या मोदी लाटेवर स्वार झाल्याने विजय होत हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा फडकवला होता.
दिंडोरी मतदारसंघ अस्तित्वात येण्यापूर्वी 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात दाखल होत, जनता दलाचे तत्कालिन विद्यमान खासदार हरिभाऊ महाले यांचा पराभव करत मालेगाव मतदारसंघात भाजपाचा झेंडा फडकविण्यात हरिश्चंद्र चव्हाण यांना यश आले होते. तेव्हापासून एक पंचवार्षिक मालेगाव तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अस्तित्वात आल्यापासून दोन पंचवार्षिक असा तीन पंचवार्षिकपासून चव्हाण यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात होता. हरिश्चंद्र चव्हाण यांच्यावर मतदारराजाची आणिपक्षातून असलेली नाराजी याचा फायदा घेण्यासाठी माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे चिरंजीव दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज महाले यांनी वडिलांची गेलेली खासदारकी पुन्हा चव्हाणांकडून घरात आणण्यासाठी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत, राष्ट्रवादीत दाखल होत उमेदवारी मिळवून मोठे आव्हान उभे केले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांचा पराभव झाला होता. मात्र यंदा त्यांना असलेली सहानुभूती चव्हाण विरोधात असलेली नाराजी याचा फायदा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर भारती पवार यांना भाजपाची उमेदवारी देऊन धनराज महाले यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले.
2014 चा निकाल
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांना 5,42,784 मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादी भारती पवार यांना 2,95,165 तर माकपच्या हेमंत वाकचौरे यांना 72,599, बसपाच्या शरद माळी यांना 17,724 आणि आम आदमी पक्षाच्या ज्ञानेश्वरी माळी यांना 4,067 मतं मिळाली होती.
मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2014 च्या तुलनेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 0.60 टक्यांनी मतदानाची आकडेवारी घटली वाढली आहे. त्यामुळे 2014 च्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत फारसा काही फरक दिसून येत नाही.
विधानसभानिहाय 2019 ची मतदानाची आकडेवारी
- नांदगाव 54.10
- कलवण-सुरगाणा 67
- चांदवड-देवळा 62.20
- येवला- लासलगाव 58.02
- निफाड 60.47
- दिंडोरी पेठ 70.32
हा मतदारसंघ आदिवासी असल्याने आदिवासींचा महत्वाचा वनजमिनीचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न, कांद्याचा प्रश्न यासह स्थानिक मुद्यांवर ही निवडणूक झाली.
दिंडोरी मतदार संघात झालेल्या सभा
- पंतप्रधान 1 सभा
- मुख्यमंत्र्यांची 1 सभा
- शरद पवार 2 सभा
- धनंजय मुंडे 1 सभा
आतापर्यंतचे खासदार – पूर्वीचा मालेगाव आणि आताचा दिंडोरी मतदारसंघ
- १९५७-६२ – यादव नारायण जाधव (प्रजा सामाजिक पक्ष)
- १९६२-६७ – एल. एल. जाधव (काँग्रेस)
- १९६७-७१- झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
- १९७१-७७ – झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
- १९७७-८० – हरिभाऊ महाले (जनता पक्ष)
- १९८०-८४ – झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
- १९८४- ८९- सीताराम सयाजी भोये (काँग्रेस)
- १९८९-९१ – हरिभाऊ महाले (जनता दल)
- १९९१-९६ – झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
- १९९६-९८- कचरुभाऊ राऊत (भाजप)
- १९९८-९९ – झेड. एम. कहांडोळे (काँग्रेस)
- १९९९-२००४ – हरिभाऊ महाले (जनता दल)
- २००४-२००९ – हरिश्चंद्र चव्हाण (भाजप)
- २००९- २०१४- हरिश्चंद्र चव्हाण (भाजप) दिंडोरी
- २०१४-१९ – हरिश्चंद्र चव्हाण (भाजप) दिंडोरी