Nagpur Lok sabha result 2019 : नागपूर लोकसभा मतदारसंघ निकाल

नागपूर लोकसभा मतदारसंघ :  नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नितीन गडकरी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नारपुरात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान पार पडलं होतं. इथे यंदा 55 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 2 टक्क्यांनी घटला. या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक लागलेली होती. या मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार नितीन […]

Nagpur Lok sabha result 2019   : नागपूर लोकसभा मतदारसंघ निकाल
नागपूर : नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

नागपूर लोकसभा मतदारसंघ :  नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नितीन गडकरी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नारपुरात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान पार पडलं होतं. इथे यंदा 55 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 2 टक्क्यांनी घटला. या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक लागलेली होती. या मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार नितीन गडकरी यांना पुन्हा संधी देण्यात आली,  तर काँग्रेसकडून नाना पटोले यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं. या मतदारसंघातील ही लढत अत्यंत चुरशीची ठरली. मात्र, नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा नागपुरात विजय मिळवला आहे.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनानितीन गडकरी (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीनाना पटोले (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरपराभूत

नागपूरकडे देशाचं लक्ष्य

लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघानंतर भाजपसाठी नागपूर देशातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ होता. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय याच मतदारसंघात आहे. शिवाय मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी भाजपचा चेहरा असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळेच नागपूरची लढत भाजपसाठी प्रतिष्ठेची आणि तेवढीच महत्त्वाची होती.  या मतदारसंघात नितीन गडकरींना भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांनी आव्हान दिलं होतं. नाना पटोले यांच्यासाठी नागपुरात दिग्गजांच्या सभा झाल्या होत्या. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही.

कुणाकुणाच्या सभा झाल्या –

भाजप – अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुषमा स्वराज, चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरी

काँग्रेस – राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण

मतदारसंघातील जातीय समीकरण

नागपूर लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरणं कधीच भाजपच्या बाजूनं नव्हती आणि आजंही नाहीत. नागपूर लोकसभा मतदारसंघात दलित, मुस्लिम, तेली, कुणबी आणि हलबा या जातींचं प्राबल्य आहे. यात मुस्लिम, दलित आणि काही प्रमाणात कुणबी हे परंपरागत काँग्रेसचे मतदार आहेत. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत फक्त दोन वेळाच भाजपला या मतदारसंगात यश मिळालं होतं. त्यात नितीन गडकरी यांचा समावेश आहे. परंपरागत मतांच्या भरवशावरच काँग्रेसचे विलास मुत्तेमवार नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आले. पण नितीन गडकरी यांच्या सर्वसमावेशक राजकारणाने नागपूर लोकसभा मतदारसंघावर भाजपनं आपली पकड अधिक मजबूत केली आहे. त्यामुळेच या लोकसभा निवडणुकीतही विजय गडकरींसाठी कठीण नाही, असं जाणकार मानतात. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य नितीन गडकरी यांना कायम ठेवता येणार का? याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.

गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांचा दारुण पराभव झाला  आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी 2 लाख 85 मतांनी विजय मिळवला.  गडकरींना 54.17 टक्के मतं मिळाली होती. आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा हा सर्वात मोठा विजय होता.

नागपूर लोकसभा मतदारसंघाची रचना

खासदार- नितीन गडकरी, भाजप

प्रमुख विरोधक- नाना पटोले, काँग्रेस

सहा विभानसभा

पूर्व नागपूर – कृष्णा खोपडे, आमदार, भाजप

मध्य नागपूर – विकास कुंभारे, आमदार, भाजप

उत्तर नागपूर – डॉ. मिलिंद माने, भाजप

दक्षिण-पश्चिम- देवेंद्र फडणवीस, आमदार, भाजप

नागपूर दक्षिण – सुधाकर कोहळे, आमदार, नागपूर

नागपूर पश्चिम- सुधाकर देशमुख, आमदार, भाजप

नागपूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. त्यात शहरी भागातील सहा विधानसभा मिळून नागपूर लोकसभा मतदारसंघ, तर दुसरा नागपूर ग्रामिणचे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून रामटेक लोकसभा मतदारसंघ आहे. नागपूर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात पूर्व नागपूर, मध्य नागपूर, उत्तर नागपूर, नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर पश्चिम आणि नागपूर दक्षिण. या सहाही विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत.

संबंधित बातम्या 

नागपूर लोकसभा: संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी, गडकरींसमोरील आव्हानं काय?  

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.