Nashik Lok sabha result 2019 : नाशिक लोकसभा मतदारसंघ निकाल
नाशिक लोकसभा मतदारसंघ : नाशिक लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांचा पराभव केला. नाशिक लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 58 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 मध्ये 58.84 टक्के मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 0.84 टक्क्यांनी घटला. […]
नाशिक लोकसभा मतदारसंघ : नाशिक लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांचा पराभव केला. नाशिक लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 58 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 मध्ये 58.84 टक्के मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 0.84 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं. या मतदारसंघात एकूण 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र भाजप महायुतीकडून हेमंत गोडसे तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून समीर भुजबळ यांच्यातच प्रमुख लढत झाली. नाशिकमध्य अगोदर चित्र वेगळं दिसत होतं. कारण अगोदर दोन उमेदवार रिंगणात दिसत होते. मात्र त्यानंतर वंचित आघाडीचे पवन पवार आणि अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी निवडणुकीत उडी घेतल्याने चौरंगी लढत झाली आणि शेवटच्या टप्प्यात मात्र निवडणूक रंगत भरली.
नाशिक लोकसभा मतदारसंघ
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | हेमंत गोडसे (शिवसेना) | विजयी |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | समीर भुजबळ (राष्ट्रवादी) | पराभूत |
अपक्ष/इतर | पवन पवार (VBA) | पराभूत |
2014 मध्ये मोदी लाटेत युतीचे हेमंत गोडसे हे जवळपास एक लाख 87 हजार मतांनी निवडणूक जिंकले होते. त्यामुळे यंदाही युतीकडून गोडसे यांनाच निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. संजय राऊत, गिरीश महाजन, दादा भुसे यांनी काही दिवस नाशिकमध्य तळ ठोकला होता.
मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2014 च्या तुलनेत नाशिक लोकसभा मतदारसंघात अवघ्या 0.84 टक्यांनी मतदानाची आकडेवारी घटली आहे. त्यामुळे 2014 च्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत फारसा काही फरक दिसून आला नाही.
विधानसभानिहाय 2019 ची मतदानाची आकडेवारी
नाशिक लोकसभा मतदारसंघ
विधानसभा 2019
सिन्नर 63 %
नाशिक पूर्व 52%
नाशिक मध्य 55%
नाशिक पश्चिम 53%
देवळाली 54%
इगतपुरी / त्रंबकेश्वर 62.40%
या निवडणुकीत छगन भुजबळ यांनी विशेष लक्ष घालून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. कारण नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांचीच उमेदवारी निश्चित होईल असं एकंदरीत गणित दिसत होतं. मात्र छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांचं नाव पुढे करुन त्यांची उमेदवारी निश्चित केल्याने नाशिकच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं. विशेष म्हणजे आजपर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघात एक खासदार सलग दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही. त्यामुळे हेमंत गोडसे यांचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं.
हेमंत गोडसे यांना युतीकडून तिकीट मिळल्याने भाजपात असलेले माणिकराव कोकाटे हे नाराज झाले आणि त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांची मात्र थोडी धावपळ उडाली. कारण माणिकराव कोकाटे यांचा फटका हा हेमंत गोडसे यांनाच बसेल अशी एकंदरीत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. तिकडे वंचित आघाडीच्या पवन पवार यांनीही प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती.
यावेळी नाशिकमधील वाहतुकीचा प्रश्न, रखडलेली इतर कामं, पाणी पुरवठा, यासह स्थानिक मुद्यांवर ही निवडणूक झाली.
नाशिक मध्ये झालेल्या सभा
- मुख्यमंत्र्यांची 1 सभा
- उद्धव ठाकरे 1 सभा
- शरद पवार 2 सभा
- राज ठाकरे 1 सभा
- प्रकाश आंबेडकर 1 सभा
- नवाब मलिक 1 सभा