दहावीचा पेपर फुटलाच नाही, पेपर फुटल्याच्या बातमीने जयसिंगपूरमध्ये खळबळ, नेमकं काय घडलं?
कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये दहावीचा पेपर फुटल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. आज दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा पेपर आहे. मात्र पेपरच्या आधाल्या दिवशीच म्हणजेच मंगळवारी रात्री विद्यार्थ्यांना संबंधित विषयाच्या प्रश्नपत्रिका मिळाल्याची बातमी होती. मात्र आता ही बातमी अफवा असल्याचे समोर आले आहे.
कोल्हापूर: कोल्हापूरच्या (Kolhapur) जयसिंगपूरमध्ये (jaysingpur) दहावीचा पेपर (Tenth Exam) फुटल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. आज दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा पेपर आहे. मात्र पेपरच्या आधाल्या दिवशीच म्हणजेच मंगळवारी रात्री विद्यार्थ्यांना संबंधित विषयाच्या प्रश्नपत्रिका मिळाल्याची बातमी होती. मात्र आता ही बातमी अफवा असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक्षात असा कोणताही प्रकार घडलाच नाही. दहावीचा पेपर फुटला नाही. विद्यार्थ्यांकडे असलेला पेपर आणि काल रात्री जो पेपर विद्यार्थ्यांना मिळाला त्यामध्ये बरीच तफावत आढळून आली आहे. विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याच्या बहाण्याने कोणीतरी हा खोडसाळपणा केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी अवघ्या पाचशे रुपयांमध्ये या पेपरची विद्यार्थ्यांमध्ये विक्री करण्यात आली होती. दरम्यान पेपरफुटीच्या वृत्ताने काही काळ केंद्रावर तणावाचे वातावरण पहायला मिळाले.
नेमकं काय घडलं?
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये दाहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा पेपर फुटल्याची अफवा पसरली होती. मंगळवारी रात्री विद्यार्थ्यांना अवघ्या पचशे रुपयांच्या मोबदल्यात आज होणाऱ्या पेपरच्या प्रति वाटण्यात आल्या होत्या. मात्र जेव्हा हे वृत्त समोर आले, तेव्हा खात्री करण्यासाठी पेपर चेक केले असाता दोनही पेपरमध्ये तफावर असल्याचे आढळून आले आहे. केवळ पैसे मिळवण्याच्या उद्देशाने कोणीतरी हा खोडसाळपणा केला असावा असा अंदाज आहे.
परिसरात गोंधळाचे वातावरण
पेपर फुटीचे वृत्त व्हायरल होताचा परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पेपर फुटल्याची बातमी समोर येताच खात्री करण्यासाठी दोनही पेपरची तपासणी करण्यात आली, त्यावेळी दोनही पेपरमध्ये तफावत असल्याचे समोर आले आहे. पेपर फुटीची अफवा असल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.