संजय राऊतांची पाठ फिरताच ठाकरेंना मोठा धक्का, शिंदे गटात 12 जणांचा प्रवेश, कोणाचा आहे समावेश ?
राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर नाशिकमधून पाहिल्यांच मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहे. आगामी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर झालेले हे पक्षप्रवेश ठाकरे गटाला मोठा धक्का देणारे आहे.

नाशिक : शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल करत संजय राऊत यांनी मुंबईची वाट धरली होती. नाशिककडे पाठ करून मुंबईच्या दिशेने जात असतांना नाशिकची हद्दही सोडलेली नसतांना ठाकरे गटाच्या 11 माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आणि मनसेच्या एका शहर पदाधिकाऱ्यांनी मुंबईची वाट धरली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शुक्रवारी सकाळी 8 वाजता. या सर्वांचा प्रवेश सोहळा वर्षा निवास्थांनी पार पडला. यामध्ये ठाकरे गटातील मनपाचे विरोधी पक्षनेते, माजी स्थायी समिती सभापती, नगरसेवक यांच्यासह मनसेच्या शहर पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. ठाकरे गटाला हे खिंडार संजय राऊत माघारी फिरत असतांना पडल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी पंधरा दिवसाच्या अंतरावर दोनदा नाशिक दौरा करूनही पदाधिकारी आणि नगरसेवकांना रोखण्यात यश आलेले नाही. दरम्यान राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर नाशिकमधून पहिल्यांदाच शिंदे गटात हा प्रवेश सोहळा झाल्यानं शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.
ठाकरे गटाचे मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरसे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, सुवर्णा मटाले, माजी स्थायी समिती सभापती आर. डी. धोंगडे, नगरसेवक ज्योती खोले, सुदाम डेमसे, जयश्री खरजुल, प्रताप मेहरोलिया, चंद्रकांत खोडे, पूनम मोगरे, राजू लवटे, आणि मनसेचे सचिन भोसले यांचा पक्षप्रवेश झाला आहे.
राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर नाशिकमधून पाहिल्यांच मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहे. आगामी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर झालेले हे पक्षप्रवेश ठाकरे गटाला मोठा धक्का देणारे आहे.
संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर नाराज पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या वन टू वन मुलाखती घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना त्याबाबत यश आले नाही.
शिंदे गटाला या पक्षप्रवेशाचा मोठा फायदा होणार असून येत्या काळात पक्षाला बाळसं येईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे, येत्या काही दिवसांत आणखी प्रवेश सोहळे होण्याची शक्यता असून तशी चर्चा सुरू झाली आहे.