Raigad Corona | रायगड जिल्ह्यात 1172 रुग्णांची कोरोनावर मात, 368 जणांवर उपचार

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत स्वत:च्या इच्छाशक्ती आणि प्रतिकारशक्तीच्या जोरावर 1103 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात (Raigad Corona Patient) केली आहे.

Raigad Corona | रायगड जिल्ह्यात 1172 रुग्णांची कोरोनावर मात, 368 जणांवर उपचार
Follow us
| Updated on: Jun 12, 2020 | 9:01 AM

रायगड : रायगड जिल्ह्यात आतापर्यंत स्वत:च्या इच्छाशक्ती आणि प्रतिकारशक्तीच्या जोरावर 1103 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात (Raigad Corona Patient) केली आहे. तर काल (11 जून) 69 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. त्यासोबत जिल्ह्यात काल 56 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली (Raigad Corona Patient) आहे.

जिल्ह्यात काल दिवसभरातही पनवेल मनपा-55, पनवेल ग्रामीण-2, उरण-1, कर्जत-7, अलिबाग-2 तळा-2, असे एकूण 69 नागरीक कोरोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

जिल्ह्यात सध्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-229, पनवेल ग्रामीण-60, उरण-10, खालापूर-3, कर्जत-7, पेण-10, अलिबाग-5, मुरुड-3, माणगाव-6, तळा-2, म्हसळा-11, महाड-15, पोलादपूर-7 अशी एकूण 368 झाली आहे.

कोरोनाबाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-596, पनवेल ग्रामीण 198, उरण-159, खालापूर-10, कर्जत-24, पेण-13, अलिबाग-36, मुरुड-13, माणगाव-46, तळा-10, रोहा-23, सुधागड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-18, महाड-2, पोलादपूर-13 अशी एकूण 1172 आहे.

आतापर्यंत पनवेल मनपा-36, पनवेल ग्रामीण-9, उरण-1, खालापूर-1, कर्जत-3, अलिबाग-3, मुरुड-2, तळा-1, श्रीवर्धन-2, म्हसळा-3, महाड-5, पोलादपूर-1 असे एकूण 67 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते कोरोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.

जिल्ह्यात काल दिवसभरात एकाही व्यक्तीची मृत व्यक्ती म्हणून नोंद झालेली नाही. आतापर्यंत जिल्ह्यातून 5 हजार 023 नागरिकांच्या स्वॅब चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी 3 हजार 318 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत तर 98 नागरिकांचे अहवाल प्रलंबीत आहेत.

संबंधित बातम्या :

Corona Updates : राज्यात तब्बल 3607 कोरोना रुग्णांची वाढ, 152 जणांचा मृत्यू

Immunity booster tips | तुळस, सुंठ, दालचिनी, रोगप्रतिकार शक्तीसाठी राज्य सरकारच्या टिप्स

हाताचे चुंबन घेऊन उपचाराचा दावा, भोंदूबाबाचा कोरोनाने मृत्यू, 19 भक्तही पॉझिटिव्ह

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.