Nashik | येवला येथे 19 रस्त्यांची कामे होणार; 5 कोटींचा निधी मंजूर, भुजबळांचे प्रयत्न सार्थकी

येवलेकरांना एक आनंदाची बातमी. आता आपल्या शहरातील नगरपालिका क्षेत्रात 19 रस्त्यांची कामे होणार असून, त्यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Nashik | येवला येथे 19 रस्त्यांची कामे होणार; 5 कोटींचा निधी मंजूर, भुजबळांचे प्रयत्न सार्थकी
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 2:49 PM

नाशिक: येवलेकरांना एक आनंदाची बातमी. आता आपल्या शहरातील नगरपालिका क्षेत्रात 19 रस्त्यांची कामे होणार असून, त्यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून ‘विशेष रस्ता योजनेअंतर्गत’ हा निधी वितरित करण्यात आला आहे. या विकास कामांमुळे येवला शहरातील स्वच्छता आणि सुशोभीकरणात अधिक भर पडणार आहे. राज्यातील नगरपालिकांना रस्ते आणि अनुषंगिक बाबींचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष रस्ते अनुदान या योजनेतून निधी दिला जातो. या योजनेतून येवला शहरातील रस्त्यांची व भूमिगत गटारांची कामे मार्गी लागणार आहेत.

या रस्त्यांची कामे होणार

येवला शहरातील अलमगीर यांचे घर ते एजाज मेंबर यांच्या घरापर्यंत भूमीगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण, रिजवान मेंबर ते ए.डी. शेख यांच्या घरापर्यंत भूमिगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण, बबलू चायवाला ते शफीक पहेलवान यांच्या घरापर्यंत भूमिगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी 10 लाख, जहागीरदार कॉलनी सादीक चमडेवाले ते अन्दरभाई मुर्गीवाले येथे भूमिगत गटारासह रस्ता खडीकरण व डांबरीकरण, तीन देऊळ ते प्रकाश सावंत ते बाबर यांची गिरणीपर्यंत भूमिगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण, नांदगांव रोड भागातील जुनी स्पेक्ट्रोलाईन फॅक्टरी परिसरात भूमिगत गटारासह रस्ता खडीरकरणासह डांबरीकरण, अंबिया शाह कॉलनी भागातील अभिन्यासातील रस्ते भूमिगत गटारासह रस्ता रस्ता खडीरकरणासह डांबरीकरण तर पारेगांव रस्ता ते चारी पावेतो भूमिगत गटारासह रस्ता कांक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या रस्त्यांना 25 लाखांचा निधी

लक्ष्मी दाल मिल ते रुग्वेदी मंगलकार्यालय ते आझाद चौक भूमिगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण, अशोक सांबर यांच्या घरापासून ते विनायक आहेर यांच्या घरापर्यंत भूमिगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी 15 लाख, राठी यांचे घरापासून ते सरदार पटेल पतसंस्थापर्यंत भूमिगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण, बजाज शोरुम ते भंडारी प्रिंटर्स पर्यत भूमिगत गटारासह रस्ता कॉक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी 20 लाख, अमित विखे यांच्या घरापासून ते राजेश भालेराव यांच्या घरापर्यंत भूमिगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण, दत्तनगर भागातील मिलन स्विट ते नितीन आहेर यांच्या घरापर्यंत भूमिगत गटारासह रस्ता काँक्रीटीकरण, बाजीराव नगरमधील दत्तमंदिर ते प्रेरणा किराणा दुकानपर्यंत भूमिगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी 25 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.

या रस्त्यांसाठी 40 लाखांचा निधी

गोशाळा कंपाऊंड लगत स. नं. 13 चे 15 अभिन्यासातील भूमिगत गटारासह सीडी वर्क व रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी 60 लाख, स. न. 14 पैकी माऊली लॉन्स पाठीमागील परिसरातील अभिन्यासातील रस्ते भूमिगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी 35 लक्ष, स.नं. 931/3 (1/2/3) व स.नं. 90 पै. अभिन्यासात रस्ते भूमिगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण, हजारे यांचे घर ते साई बिल्डर्स ते गायकवाड यांच्या घरापर्यंत भूमिगत गटारासह रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रत्येकी 40 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

इतर बातम्याः

Ramdas Kadam| कदमांचे 5 वार; शिवसेना संपवण्याची हरामखोरी मंत्र्यांकडून सुरू, उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कारवाईची मागणी

हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवा, परब हे खेडेकर-कदम यांचे ‘महात्मा गांधी’; रामदास कदम यांचा हल्लाबोल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.