दुष्काळ झळा… नाशिकमध्ये 40 मोरांचा तडफडून मृत्यू

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला आहे. या दुष्काळापासून पशू-पक्षीही वाचू शकलेले नाहीत. त्यातच आता नाशिकमध्ये 40 पेक्षा जास्त मोर या दुष्काळाचे बळी ठरले आहेत. अन्न आणि पाणी न मिळाल्याने या मोरांचा तडफडून मृत्यू झाला आहे. नाशिकच्या चांदवड येथील दहीवड-दीघवड गावात हा धक्कादायक प्रकार घडला. येथे 40 पेक्षा जास्त मोरांचा मृत्यू झाला. या मोरांना वेळेवर पुरेसं अन्न […]

दुष्काळ झळा… नाशिकमध्ये 40 मोरांचा तडफडून मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला आहे. या दुष्काळापासून पशू-पक्षीही वाचू शकलेले नाहीत. त्यातच आता नाशिकमध्ये 40 पेक्षा जास्त मोर या दुष्काळाचे बळी ठरले आहेत. अन्न आणि पाणी न मिळाल्याने या मोरांचा तडफडून मृत्यू झाला आहे.

नाशिकच्या चांदवड येथील दहीवड-दीघवड गावात हा धक्कादायक प्रकार घडला. येथे 40 पेक्षा जास्त मोरांचा मृत्यू झाला. या मोरांना वेळेवर पुरेसं अन्न आणि पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेनंतर वनविभागाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. वनविभागाने दुर्लक्ष केल्याने या मोरांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वनविभाग दुर्लक्ष करत असल्याने अखेर या मोरांचं संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी स्वत: पाण्याचे साठे तयार केले होते. मात्र, तरीही या मोरांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं नाही.

आधीच देशातील जैवविविधता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. वाढत्या आधुनिकीकरणामुळे पशू-पक्षांच्या कित्येक प्रजाती लोप पावल्या आहेत. देशात वाघांची संख्या जेमतेम उरली आहे. त्यामुळे वनविभागाने आता वन्य प्राणीजीवांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

VIDEO :

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.