चंद्रपुरात तेराव्याच्या जेवणाचे निमंत्रण, 40 लोकांना विषबाधा, पोलीस पाटलाकडून लॉकडाऊनचे उल्लंघन

चंद्रपूर शहरातील मूल मार्गावर अजयपूर येथे 40 लोकांना अन्नातून विषबाधा झाली (Poisoning from food chandrapur) आहे.

चंद्रपुरात तेराव्याच्या जेवणाचे निमंत्रण, 40 लोकांना विषबाधा, पोलीस पाटलाकडून लॉकडाऊनचे उल्लंघन
मसालेदार अन्न केवळ नुकसानदायीच नाही! हे फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित
Follow us
| Updated on: Apr 12, 2020 | 9:13 AM

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील मूल मार्गावर अजयपूर येथे 40 लोकांना अन्नातून विषबाधा झाली (Poisoning from food chandrapur) आहे. गावातील एका व्यक्तीच्या घरी तेराव्याच्या जेवणाचे निमंत्रण होते. या जेवणानंतर गावातील एकूण 40 लोकांना विषबाधा झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. विषबाध झालेल्यांना तातडीने चिचपल्ली प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आले. तर काहींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या विषबाधा झालेल्यांवर डॉक्टरांचे उपचार (Poisoning from food chandrapur) सुरु आहेत.

चंद्रपूरमधील अजयपूर गावातील पोलीस पाटील यांच्या घरी तेराव्याचे जेवण होते. यासाठी संपूर्ण गावाला जेवणाचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र जेवण केल्यानंतर दुपारपासून गावातील अनेकांना मळमळ-उलट्या आणि तापाचा त्रास सुरु झाला. रुग्ण वाढल्याने जवळच्या चिचपल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वांना दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आरोग्य केंद्रात रुग्णांना आणले जात होते.

राज्यासह देशावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना ग्रामीण भागात यातून कुठलाही बोध घेतला जात नसल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यात दिसत आहे. देश लॉकडाऊन असताना सामाजिक दूरता पाळायची आहे. धार्मिक विधी-कार्यक्रम यावर बंदी असतानाही कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस पाटलाच्या घरीच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस देशासह राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. देशात आतापर्यंत साडे सहा हजार कोरोनाबाधित आढळले आहेत. तर राज्यात 1700 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....