Osmanabad Corona : उस्मानाबादेत कोरोनाचा कहर, कळंबमध्ये सराफा दुकानातील 42 जण पॉझिटिव्ह!

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमध्ये सराफा लाईनमध्ये एकाच दिवसात 42 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर अन्य 10 जणांची चाचणीही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे कळंबमध्ये एकाच दिवसात 50 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

Osmanabad Corona : उस्मानाबादेत कोरोनाचा कहर, कळंबमध्ये सराफा दुकानातील 42 जण पॉझिटिव्ह!
कोरोना चाचणी करताना डॉक्टर्स
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 5:39 PM

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांच्या संख्येतही आता वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता कपडा, सोने आणि आडतीची मोठी बाजारपेठ असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमध्ये सराफा लाईनमध्ये एकाच दिवसात 42 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर अन्य 10 जणांची चाचणीही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे कळंबमध्ये एकाच दिवसात 50 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.(42 corona positive in gold shop in Kalamb in Osmanabad district)

प्रशासनाने व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सराफा लाईनमधील व्यापारी आणि कामगारांची कोरोना चाचणी करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी अनेकांना कोणतीही लक्षणं नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, कळंब शहरातील सर्व व्यापारी आणि कामगारांची कोरोनाचा चाचणी पुढील 8 दिवसांत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

व्यापारी, कामगारांची कोरोना चाचणी

19 मार्च – औषधी दुकाने 20 मार्च – किराणा दुकाने 22 मार्च – बेकरी, हॉटेल्स, लॉज, बियर बार 23 मार्च – जनरल स्टोअर्स 24 मार्च – भाजी, फळ विक्रेते 25 मार्च – केशकर्तनालय 26 मार्च – कृषी संबंधित दुकाने 27 मार्च – कापड दुकाने 28 मार्च – गॅरेज, ऑटोमोबाईल्स दुकाने

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना स्थिती

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा विचार केला तर बुधवारी जिल्ह्यात एकूण 94 नवे रुग्ण आढळून आले होते. बुधवारच्या आकडेवारीनुसार उस्मानाबाद जिल्यात सध्या कोरोनाचे 512 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर एकूण 18 हजार 59 रुग्ण उस्माबाद जिल्ह्यात आढळले होते. त्यापैकी 16 हजार 953 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 93.88 टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 589 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आठवड्याभरातील कोरोनाची वाढ

10 मार्च – 24 रुग्ण 11 मार्च – 58 रुग्ण 12 मार्च – 27 रुग्ण 13 मार्च – 54 रुग्ण 14 मार्च – 69 रुग्ण 15 मार्च – 52 रुग्ण 16 मार्च – 123 रुग्ण 17 मार्च – 94 रुग्ण

संबंधित बातम्या :

शॉपिंग मॉल, सिनेमागृहात मास्क बंधनकारक; अंत्यविधीपासून लग्नापर्यंत जालन्यातील नवे निर्बंध काय?

Aurangabad Lockdown : औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शहरातील हॉटेल्स बुधवारपासून बंद!

42 corona positive in gold shop in Kalamb in Osmanabad district

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.