लाखों रुपये दिले…नियुक्ती पत्र मिळाले…मेडिकलही झालं…नंतर जे काही समोर आलं ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल…
भावसिंग साळुंखे, मनिषा साळुंखे, श्रृतीका साळुंखे यांच्या विरोधात ही तक्रार दिली असून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत 55 लाखांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
नाशिक : फसवणुकीच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतांना अनेक नागरिक आमिषाला बळी पडून फसवणुक् करून घेत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने धक्कादायक बाब समोर आली असून पोलीसही चक्रावून गेले आहे. रेल्वे मध्ये नोकरीला लावून देतो म्हणून पाच जणांना एका कुटुंबाने 55 लाखांना गंडवल्याची घटना समोर आली आहे. अंबड पोलीस ठाण्यात पती पत्नीसह मुलीवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे संशयितांनी पाच मुलांना बनावट नियुक्तीपत्र दिले होते, त्यानुसार पाचही जणांची आरोग्य चाचणी झाली होती. आणि त्यानंतर रुजू होण्यासाठी गेलेल्या तरुणांना कामावर रुजू करून न घेता आपली फसवणूक झाल्याचे सांगण्यात आल्याने पाचही मुलं आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. विशेष ज्या व्यक्तीने तक्रार दिली आणि ज्यांच्या विरोधात दिली ते एकाच इमारतीमध्ये राहतात, या घटणेनंतर मात्र तिघेही फरार झाले आहे.
नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार, अंबड हद्दीतील एकदंत नगर येथे राहणाऱ्या स्वप्नील विसपुते याने फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.
भावसिंग साळुंखे, मनिषा साळुंखे, श्रृतीका साळुंखे यांच्या विरोधात ही तक्रार दिली असून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत 55 लाखांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
रेल्वेमध्ये असलेले मोठे अधिकारी माझ्या ओळखीचे असून ऑनलाईन परिक्षामध्ये पास झाल्यानंतर तत्काळ नोकरी देण्याचे आमिष दिले.
विसपुते यांनी त्यांचे नातेवाईक पंकज पवार, सोनाली पाटील, मनिषा सुरवाडे, शिवाजी मगळकर, यांना याबाबत सांगीतले. नोकरी मिळत असल्याने संशयिताच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
खरंटर साळुंखे या दाम्पत्याने मुलगी रेल्वेत नोकरीला लागली म्हणून संपूर्ण बिल्डिंगमध्य पेढे वाटले होते. त्यावेळी लोकांनी विचारले होते कशी काय नोकरी लागली.
साळुंखे यांनी सांगितले माझ्या ओळखीने झाले, अजून 11 जागा आहे. ऑनलाईन परीक्षा द्या मी तुमचे काम करून देतो.
विसपुते यानं विश्वास ठेवत लाखों रुपये दिले, नातेवाईक असलेल्या आणखी चौघांना पैसे भरून नोकरी मिळत असल्याचे सांगितले आणि त्यांनीही विश्वास ठेवत पैसे दिले.
नंतर या पाचही जणांनी ऑनलाईन परीक्षा दिली, त्यानंतर साळुंखे याने पाचही जणांचे बनावट निकल त्यांना दिले, त्यानंतर बनावट नियुक्ती पत्रही दिले. नाशिक, मुंबई आणि जबलपुर येथे नियुक्ती राहील असे सांगत त्यांचे मेडिकल देखील केले.
मात्र, हे पाचही जण नियुक्तीला गेले तेव्हा अशीही कुठलीही भरती झाली नसून तुमची फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले, त्यांतर विसपुते यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.