Latur : वीज पडून मेंढपाळाचा मृत्यू, शिवार ओलांडून गेलेल्या शेळ्याही परतल्याच नाहीत
वीज कोसळून मृत्यूमुखी झालेले लहू घोडके हे मूळचे औसा तालुक्यातील हत्तरगा येथील रहिवाशी होते. पण ते शेळ्या चारण्यासाठी किल्लारी शिवारात जात असत. नेहमी प्रमाणे ते शेळ्या चारत असतानाच अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घोडके यांनी चिंचेचे झाड जवळ केले. शिवाय पावसामध्ये वाढ होताच चरत असलेल्या शेळ्याही झाडाखाली आल्या. तेवढ्याच वीज ही नेमकी त्याच झाडावर कोसळली.
लातूर : राज्यात मान्सून लांबला असला तरी (Latur District) लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून (Climate Change) वातावरणात बदल झाला आहे. बुधवारी सायंकाळी तर वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. शिवाय किल्लारी शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये वीज कोसळल्याने एका मेंढपाळाचा दुर्देवी मृत्यू झाला शिवाय 6 शेळ्याही या दुर्घटनेत दगावल्या आहेत. वादळी वाऱ्यासह (Heavy Rain) पावसाला सुरवात झाल्याने मेंढपाळ लहू घोडके यांनी जवळच असलेल्या झाडाचा आडोसा घेतला. त्यांच्याबरोबर शेळ्याही त्याच झाडाखाली आल्या. मात्र, काही वेळातच नेमकी त्याच झाडावर वीज कोसळली. यामध्ये लहू घोडके यांचा जागीच मृत्यू झाला पण शेळ्याही दगावल्या. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस हा नुकासानीचा ठरला आहे.
शिवार ओलांडून गेलेले घोडके परतलेच नाहीत
वीज कोसळून मृत्यूमुखी झालेले लहू घोडके हे मूळचे औसा तालुक्यातील हत्तरगा येथील रहिवाशी होते. पण ते शेळ्या चारण्यासाठी किल्लारी शिवारात जात असत. नेहमी प्रमाणे ते शेळ्या चारत असतानाच अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घोडके यांनी चिंचेचे झाड जवळ केले. शिवाय पावसामध्ये वाढ होताच चरत असलेल्या शेळ्याही झाडाखाली आल्या. तेवढ्याच वीज ही नेमकी त्याच झाडावर कोसळली. यामुळे शेळ्या चारण्यासाठी गेलेले ना लहू घोडके परतले ना त्या शेळ्या. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी आणि दोन मुले आहेत.
महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी
लातूर जिल्ह्यातील वातावरणामध्ये बदल झाला आहे. दुपारनंतर सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट हा ठरलेलाच आहे. वीज कोसळून मेंढपाळासहा शेळ्यांचा मृ्त्यू झाल्याची घटना समजताच महसूलच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळाची पाहणी करुन पंचनामा केला आहे. शिवाय घोडके यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लातूर जिल्ह्यात पूर्वमान्सूनच्या सरी
गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. शिवाय हा पाऊस खरिपासाठी पोषक असल्यााने शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे उरकली असून आता सरासरी एवढा पाऊस झाला की शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवणार आहे. यंदाही सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होईल असाच अंदाज आहे.