समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच, जालन्याजवळ दोन कारची भीषण धडक, 6 ठार

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. जालन्यामधील कडवंची गावाजवळ दोन कार एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असू न चौघे जण जखमी झाले आहेत.

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच, जालन्याजवळ  दोन कारची भीषण धडक, 6 ठार
Follow us
| Updated on: Jun 29, 2024 | 7:45 AM

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. जालन्यामधील कडवंची गावाजवळ दोन कार एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असू न चौघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्यामधील कडवंची गावाजवळ रात्री ११ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नागपूरकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आर्टिगा कारला राँग साईडने येणाऱ्या लिफ्ट डिझायर कारने धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आर्टिगाला राँग साईडने येणाऱ्या सिफ्टची धडक बसून हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, स्विफ्ट कारनं धडक दिल्यामुळं अर्टिगा कार आणि स्विफ्ट कार महामार्गावरचे बॅरिकेड मोडून थेट खाली पडली. या भीषण धडकमेमुळे 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चौघे जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे समजते. नागपूरवरून येणाऱ्या कारमधील चौघांचा मृत्यू झाला तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारमधील दोघांनी जीव गमावला.

विरुद्ध दिशेने येणारी ही कार स्थानिक लोकांची होती, अशी माहिती मिळत आहे. गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी ते विरुद्ध दिशेने येत होते. तर नागपूरहून मुंबईच्या दिशेने येणारी कार अतिशय वेगात होती. दोन्ही कारची जोरदार टक्कर झाली. हा अपघात अतिशय भीषण होता. त्यामध्ये कारचाही अक्षरश: चेंदामेंदा झाला.  त्यामध्ये सह जणांना जीव गमवावा लागला. तर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मृतांची ओळख पटली नाही

या अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं. मात्र अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस आणि इतर मदतकार्य घटनास्थळी पोहचायला उशीर झाला. त्यामुळं मृतांची संख्या वाढल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिलीय. रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्यानं मृतांची ओळख अजून पटली नसून या प्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

समृद्धी महामार्गावर नेहमीच असे अपघात घडत असतात, त्यामुळे अपघातांची ही मालिका रोखण्यासाठी प्रशासनाने महत्वाची पावले उचलून उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.