Parbhani : दुर्देवी घटना..! महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये 6 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
महापालिकेने उभारलेल्या जलतरण तलावात पोहायला आलेल्या एका 6 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 10 च्या दरम्यान घडली. अभिमन्यू धनंजय टेकाळे (वय 6) असे या दुर्देवी घटनेत मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. अभिमन्यू हा आपल्या वडिलांसोबत पोहायला शिकण्यासाठी येत होता. रविवारीही तो नेहमीप्रमाणे आला पण पोहत असताना बुडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
परभणी : महापालिकेने उभारलेल्या (Swimming Pool) जलतरण तलावात पोहायला आलेल्या एका 6 वर्षीय (Children) मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 10 च्या दरम्यान घडली. अभिमन्यू धनंजय टेकाळे (वय 6) असे या दुर्देवी घटनेत मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. अभिमन्यू हा आपल्या वडिलांसोबत पोहायला शिकण्यासाठी येत होता. रविवारीही तो नेहमीप्रमाणे आला पण पोहत असताना बुडून त्याचा जागीच मृत्यू झाला. 6 वर्षाच्या मुलाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या (Summer) उन्हाळ्यामध्ये त्याला पोहायला शिकायचे होते. नेमकी घटना कशी घडली याचा शोध आता पोलिसांनी सुरु केला आहे.
‘समर सिझन’मध्ये शिकायचे होते पोहायला
यंदा उन्हाळ्यात पोहायला शिकण्याचा हट्ट अभिमन्यूने आपल्या वडिलांकडे केला होता. शहरातील महापालिकेच्य जलतरण तलावामध्ये सोय असल्याने तो रोज वडिलांसोबत पोहायला येत असत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तो अधिक काळ पोहायला शिकत होता. दरम्यान, पोहत असतानाच तो पाण्यात बुडाला हे कुणाच्याच लक्षात आले नाही. मात्र, त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना हे वास्तव समोर आले. या घटनेनंतर मुलाचा मृतदेह परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला होता. शासकीय रुग्णालय परिसरामध्ये मुलांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.
जलतरण तलावाला टाळे ठोकून कर्मचाऱ्यांचा पोबारा
ही धक्कादायक घटना समोर येताच महापालिकेच्या या जलतरण तलावाला टाळे ठोकून येथील अधिकारी आणि कर्मचारी हे पसार झाले होते. कारवाईला सामोरे जावे लागेल म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले. मात्र, पोलिसांनी तपासाला सुरवात केली असून नेमकी घटना कशी घडली याचा शोध सुरु आहे. मात्र, रविवारी दुपारपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
रुग्णालयासमोर नातेवाईकांची गर्दी
या घटनेनंतर उत्तरीय तपासणीसाठी अभिमन्यूचा मृतदेह हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. दरम्यान, ही घटना वाऱ्यासारखी शहरामध्य़े पसरली होती. यावेळी टेकाळे यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. घटनेनंतर स्विमिंग पूलला चक्क कुलूप लावून चालक आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी हे गायब झाले आहेत.
इतर बातम्या :
Jalgaon : वाघूर नदीत 12 वर्षांच्या मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ
Nagpur Crime | हैदराबादवरून एमपीकडं जाणारा 197 किलो गांजा जप्त, नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई