75th Independence Day : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक तिरंगी आरास
75th Independence Day आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंढरपुरमध्ये श्री विठ्ठल मंदिरात विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास करण्यात आली आहे.
सोलापूर : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (75th Independence Day) साजरा होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोबोतच ऐतिहासिक इमरतींना सजवण्यात आले आहे. त्या ठिकाणी आकर्षक विदयुत रोषणाई देखील करण्यात आली आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंढरपुरमध्ये (Pandharpur) श्री विठ्ठल मंदिरात (Vitthal Temple) विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास करण्यात आली आहे. श्रावणी सोमवार आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झेंडू, शेवंती आणि तुळशीच्या पानांने देवाचा गाभारा, सोळाखांबी प्रवेश द्वार आणि सभामंडप सजवण्यात आला आहे. सभामंडपात तिरंग्याची आकर्षक आरास करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त विठ्ठलास पिवळा अंगारखा, जांभळे धोतर आणि तिरंग्याचे उपरणे असा पोशाख करण्यात आला आहे. तर संपूर्ण विठ्ठल मंदिराला तिरंगा रंगाची आकर्षक अशी विद्युत रोषणाई लावण्यात आली आहे. तिरंग्यामध्ये सजलेले देवाचे रूप पाहण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात मोठी गर्दी केली आहे.
मंदिरात भाविकांची गर्दी
आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. तसेच श्रावणी सोमवार देखील यानिमित्ताने पंढरपूरमधील विठ्ठलाचे मंदिर आकर्ष पद्धतीने सजवण्यात आले आले. मंदिरात विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून तिरंग्याची आरास करण्यात आली आहे. यासाठी झेंडू शेंवती आणि इतर फुलांचा वापर करण्यात आला आहे. देवाचा गाभारा, सोळाखांबी प्रवेश द्वार आणि सभामंडप विविध फुलांचा वापर करून आकर्ष पद्धतीने सजावणयात आले आहेत. आज श्रावणी सोमवार असल्याने पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
आज 75 स्वातंत्र्यदिन आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आजोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक वास्तूंची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच तिरंग्याची रोषणाई केल्याचे देखील पहायला मिळत आहे. पुण्यात मध्यरात्री शनिवारवाड्यासमोर ध्वाजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार गिरीश बापट यांच्यासह महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि तीन हजारांपेक्षा अधिक पुणेकरांची उपस्थिती होती.