Pune | इंदापुरात 84 किलोचा बोकड चोरीला

Pune | इंदापुरात 84 किलोचा बोकड चोरीला

| Updated on: Mar 17, 2022 | 5:53 PM

धुळवडीच्या मुहूर्तावर इंदापूर (Indapur) तालुक्यातील सरडेवाडी जवळच्या शिदवस्ती येथील युवा शेतकऱ्याच्या शेळी (Goat) फार्ममधील (Farm)अत्यंत रुबाबदार दिसणाऱ्या  बिटल जातीच्या बोकडाची व उस्मानाबादी शेळीची झालेल्या चोरीची चर्चा इंदापूर तालुक्यात सुरू आहे.

धुळवडीच्या मुहूर्तावर इंदापूर (Indapur) तालुक्यातील सरडेवाडी जवळच्या शिदवस्ती येथील युवा शेतकऱ्याच्या शेळी (Goat) फार्ममधील (Farm)अत्यंत रुबाबदार दिसणाऱ्या  बिटल जातीच्या बोकडाची व उस्मानाबादी शेळीची झालेल्या चोरीची चर्चा इंदापूर तालुक्यात सुरू आहे. धुळवडीच्या मुहूर्तावर बोकड चोरी गेल्याने युवा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चोरीला गेलेल्या बोकडाचे वजन 84 किलो असून त्याची किंमत 40 हजार रुपयांहून अधिक होती. तर शेळीची किंमत 18 हजार होती. शिद वस्तीच्या शेळी फार्म वर 14 लहान-मोठ्या शेळ्या,7 लहान-मोठी बोकडे असे एकूण 21 शेळ्या व बोकडे होती. दोन दिवसांपूर्वी सकाळी चारा टाकण्यासाठी  गेले असता त्यांना जाळी तोडल्याचा प्रकार दिसून आला.  शेळी व बोकडाची चोरी झाल्याचे युवा शेतकरी अजय शिद यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. इंदापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.