सुखवार्ताः नाशिक विभागात 9 लाख 77 हजार 400 जण कोरोनामुक्त; मृत्युदर फक्त 2 टक्के
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागात आजपर्यंत 9 लाख 98 हजार 560 रुग्णांपैकी 9 लाख 77 हजार 400 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
नाशिकः सध्या सगळीकडे ओमिक्रॉन विषाणूची भीती, दहशत, तो किती भयंकर आहे, याच्याच बातम्या सुरू आहेत. मात्र, अशा भयप्रद वातावरण एक आनंददायक बातमी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागात आजपर्यंत 9 लाख 98 हजार 560 रुग्णांपैकी 9 लाख 77 हजार 400 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत 1 हजार 61 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात 20 हजार 45 रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.88 टक्के आहे, तर मृत्युदर 2.00 टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.
नाशिकः रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.77 टक्के
नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 79 लाख 54 हजार 739 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 9 लाख 98 हजार 560 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 12 हजार 369 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 4 लाख 03 हजार 182 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 464 रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.77 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 723 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर 2.11 टक्के आहे.
अहमदनगरः रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.84 टक्के
अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 57 हजार 270 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 3 लाख 49 हजार 566 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 581 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.84 टक्के इतके आहे. आजपर्यंत 7 हजार 123 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर 1.99 टक्के आहे.
धुळेः रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.42 टक्के
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 45 हजार 899 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 45 हजार 175 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 01 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.42 टक्के इतके आहे. आजपर्यंत 671 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 1.46 टक्के आहे.
जळगावः रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.18 टक्के
जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 799 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 1 लाख 40 हजार 212 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 08 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.18 टक्के इतके आहे. आजपर्यंत 2 हजार 577 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 1.80 टक्के आहे.
नंदुरबारः रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 40 हजार 223 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 39 हजार 265 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 07 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के इतके आहे. आजपर्यंत 951 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 2.36 टक्के आहे.
इतर बातम्याः
साहित्य संमेलनातच लसीकरणाचा मांडव, लस न घेतलेल्यांना जागेवरच डोस; शाळांचा निर्णय 10 डिसेंबरनंतर
आनंदवार्ताः नाशिक – कल्याण रेल्वेने सुस्साट, डिसेंबरमध्ये लोकलची चाचणी, नववर्षाचे गिफ्ट मिळणार?