महिलेची छेड काढून गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या नालासोपारा पोलिसांनी मुसक्या आवळल्या, घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद

22 फेबुरवारी रोजी रात्री 11.45 वाजता नालासोपारा रेल्वेस्थानाकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील सरकत्या जिनावरून महिला निघाली होती. त्यावेळी मोहम्मद शाहरुख बाबूनीसार खान हा मागून आला आणि त्याने महिलेला मागून स्पर्श केला.

महिलेची छेड काढून गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या नालासोपारा पोलिसांनी मुसक्या आवळल्या, घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद
नालासोपारा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 9:21 AM

पालघर – नालासोपारा (nalasopara) स्थानकात मागून जाऊन महिलेला स्पर्श करणा-या आरोपीला 24 तास उलटायच्या आगोदर अटक केली आहे. ही घटना काल नालासोपारा रेल्वे स्थानकातल्या (railway station) प्लॅटफॉर्म क्रमांक 2 घडली होती. त्यावेळी महिला सरकत्या जिन्यावर जात असताना आरोपीने मागून स्पर्श केला. त्यावेळी त्या महिलेने तिथं आरडाओरड केली, त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या अनेकांना आरोपीला पकडून चोप दिला. परंतु तिथूनही आरोपी निसटून गेला. त्यानंतर पोलिसांनी (police) तो व्हिडीओ पाहिला आणि चौकशी सुरू केली. पोलिसांना गुंगारा देणा-या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. पकडलेला आरोपी माथेफिरू असल्याचं समजतंय, तसेच तो नालासोपारा परिसरातील रहिवासी देखील आहे. आरोपीला अटक केल्यापासून नालासोपारा पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केल्याचे समजते. तसेच आत्तापर्यंत इतर कोणते गुन्हे त्याने केले आहेत का ? याची देखील चौकशी होणार आहे.

24 तासांच्या आत आरोपीला अटक

प्रकरण झाल्यानंतर रेल्वे स्थानकातून पळ काढलेल्या तरूणांचं नाव मोहम्मद शाहरुख बाबूनीसार खान (वय 24) असे आहे. तो नालासोपारा पूर्व प्रगती नगर परिसरातील शिवानंद अपार्टमेंट मधील राहणारा आहे. त्याने महिलेला मागून स्पर्श केल्याचं दिसतं आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनेच्या जवळ असलेला एक सीसीटिव्हा तपासला त्यानंतर तिथल्या परिसरात निघून गेल्याचे देखील सीसीटिव्ही फुटेज तपासले. कारण आरोपी नेमका कोण आहे आणि कुठला आहे, तसेच बाहेर कुठे पळून गेला हे पाहायचे होते. पोलिसांना हा आरोपी नालासोपारा परिसरात असल्याचे चौकशीत समोर आले. त्याला त्याच्या घरातून अटक केली असून तो माथेफिरू असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे पोलिस त्याच्यावर कोणती कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

व्हिडीओत कैद झालेली घटना

22 फेबुरवारी रोजी रात्री 11.45 वाजता नालासोपारा रेल्वेस्थानाकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील सरकत्या जिनावरून महिला निघाली होती. त्यावेळी मोहम्मद शाहरुख बाबूनीसार खान हा मागून आला आणि त्याने महिलेला मागून स्पर्श केला. स्पर्श केल्याची जाणून झाल्यानंतर महिलेनी तात्काळ त्याला तिथं हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपीने सुध्दा महिलेला मारहाण केली. त्यावेळी महिलेचा मोबाईल तिच्या हातातून खाली पडला. महिलेने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निसटून जाण्यात तिथून यशस्वी झाला.

दोन दिवसांपासून यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरू, कारवाईत काय हाती लागलं हे मात्र गुलदस्त्यात

विरार गोळीबार प्रकरणी शिवसेनेच्या चौधरींसह 8 जणांवर गुन्हा दाखल; बदला घेण्यासाठी फायरिंग केल्याचं उघड

डाळीच्या ठोक भावात घसरण सुरूच, गेल्या वर्षभरात उडीद डाळीच्या दरात 5 टक्क्यांची घट

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.