विमानप्रवासाला निघाली, टॅक्सीने विमानतळावर पोहचली; मग जे घडले त्याने प्रवाशांसह पोलीसही हैराण झाले !

ती टॅक्सीने विमानतळावर आली. टॅक्सीतून उतरताच टॅक्सी चालकाने भाडे मागितले. यानंतर महिलेचा संताप झाला आणि मग तिने जे केले त्याने पोलीसही हैराण झाले.

विमानप्रवासाला निघाली, टॅक्सीने विमानतळावर पोहचली; मग जे घडले त्याने प्रवाशांसह पोलीसही हैराण झाले !
पुणे विमानतळावर महिलेचा राडाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 5:14 PM

पुणे / अभिजीत पोते : पुणे विमानतळावर एका महिलेने राडा केल्याची घटना उघडकीस आली आहे. माथेफिरु महिलेने समजावण्यासाठी गेलेल्या एका महिला सीआयएसएफ निरीक्षकावरही हल्ला केला. पुणे विमानतळावर 12 मार्च रोजी रात्री 12 वाजता ही घटना घडली. गुंजन अगरवाल असे या महिलेचे नाव आहे. गुंजनला पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणला प्रकरणी या महिलेवर गुन्हा दाखल असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. याप्रकरणी पुणे विमानतळावर कार्यरत असणाऱ्या सीआयएसएफ निरीक्षक रूपाली ठोके यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर महिला मनोरुग्ण असल्याचे कळते.

टॅक्सी चालकाने भाडे मागितले असता संतापली महिला

मिळालेल्या माहितीनुसार, गुंजन अगरवाल ही महिला टॅक्सीमधून प्रवास करून विमानतळावर पोहचली. टॅक्सीतून उतरताच चालकाने भाडे मागितले, मात्र तिने टॅक्सी चालकाला पैसे देण्यास नकार दिला. याप्रकरणी टॅक्सी चालकाने एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे मदत मागितली. यावेळी टर्मिनल मॅनेजर भक्ती लुल्ला यांनी गुंजन यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र गुंजनने लुल्ला यांनाच शिवीगाळ केली, तसेच विमानतळ प्रस्थान गेट क्र. 1 वर रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये जाऊन गोंधळ घातला.

महिला निरीक्षकावर हल्ला

हा सगळा प्रकार विमानतळावर सुरक्षतेसाठी कार्यरत असलेल्या महिला निरीक्षक रूपाली ठीके यांना निदर्शनास आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपी अगरवाल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी महिलेने त्यांचे काही न ऐकता फिर्यादी यांची शासकीय ड्रेसची कॉलर पकडली आणि त्यांना चापट मारली. इतक्यावर न थांबता आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला.

हे सुद्धा वाचा

मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.