नाशिकमधून शिवसेनेच्या दोन्ही गटाची ‘अशी’ आहे गर्दी जमविण्यासाठी फिल्डिंग
मुंबईची परसबाग असलेल्या नाशिकमधून सर्वाधिक शिवसैनिक कसे घेऊन जाता येईल यासाठी दोन्ही गटाचे बस बुकिंग पूर्ण झाले असून तयारी अंतिम टप्यात आली आहे.
नाशिक : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर यंदाच्या वर्षी प्रथमच शिवसेनेचे (Shivsena) दोन दसरा (Dassehra) मेळावे होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क येथील मैदानावर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बीकेसी येथील मैदानावर होणार आहे. त्यामुळे कुणाच्या मेळाव्या जास्ती गर्दी होईल यासाठी मोठी चुरस सुरू असल्याचे दिसून येत आहे. नाशिकमधून याच पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला जाण्यासाठीची तयारी अंतिम टप्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावतीने पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे आणि आमदार सुहास कांदे, प्रवीण तिदमे यांच्याकडून तयारी केली जात आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना उपनेते सुनील बागूल, महानगरप्रमुख सुधाकर बडगूजर, वसंत गीते, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर प्रयत्न करीत आहे.
मुंबईची परसबाग असलेल्या नाशिकमधून सर्वाधिक शिवसैनिक कसे घेऊन जाता येईल यासाठी दोन्ही गटाचे बस बुकिंग पूर्ण झाले असून तयारी अंतिम टप्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला 50 हजाराहून अधिक शिवसैनिक जाणार असल्याचा दावा केला जात असून त्यासाठी बस, रेल्वे आणि इतर खाजगी वाहनांचे बुकिंग करण्यात आले आहे.
तर उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला 25 ते 30 हजार शिवसैनिक जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात असून तयारी अंतिम टप्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाने नाशिक मधून तब्बल ३३७ बसेस आणि ४२४ चारचाकी वाहनांच नियोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामधून जवळपास ४० ते ५० हजार शिवसैनिक बीकेसीवर जाणार आहे.
तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेनीही शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांची बैठक बोलावत जिल्हाभरातून तब्बल २० ते २५ हजार शिवसैनिक शिवतीर्थावर नेण्याच नियोजन पूर्ण केलय,
आम्हाला भाड्याने लोक आणण्याची गरज नसून जे येतील ते कट्टर शिवसैनिक असतील असा दावा केलाय, ठाकरे गटाने केवळ जेष्ठ नागरिक आणि महिलांसाठी १०० बसेसच नियोजन केलं आहे.
नाशिकमधून शिंदे आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली आहे, दोन्ही गटाकडून हा मेळावा प्रतिष्ठेचा झाला आहे.
दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याचं मोठं आव्हान असणार आहे आणि त्यासाठीच ही जोरदार तयारी नाशिक जिल्ह्यातूनही सुरू आहे.