मुख्यमंत्र्याच्या भंडारा दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणारी बोट बुडाली

वैनगंगा नदीवर जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे.

मुख्यमंत्र्याच्या भंडारा दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणारी बोट बुडाली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 5:34 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोट बुडून तिचे तीन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील अधिक तपशील समजू शकलेला नाही. या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. त्याच वेळी हा अपघात घडला आहे. या भंडारा दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोट एका खडकावर आपटून तिचे तीन तुकडे झाल्याची घटना घडली…

वैनगंगा नदीवर जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. येथील रेल्वे मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे सुद्धा उपस्थित राहणार असून भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत यांच्या स्वागताचे भंडारा जिल्ह्यात जागोजागी होर्डिंग लावण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देणारा आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पाने रोजगारात वाढ होणार आहे. दरम्यान, अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

काय आहे प्रकल्प

वैनगंगा नदीच्या पात्रावर असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या (Gosekhurd Dam) बॅक वॉटरवर हा जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्पा साकारला जात आहे. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरच या प्रकल्पाची उभारणी होत असल्याने दोन्ही जिल्ह्यातील सुमारे 10 हजाराहून अधिक बेरोजगारांना येथे रोजगार उपलब्ध होईल असे म्हटले जात आहे. या प्रकल्पासाठी 102 कोटींचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.