उद्धव ठाकरेंनी केलेला दावा ठरला खरा, माजी खासदार चंद्रकांत खैरेंवर गुन्हा दाखल…
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे जोरदार टीका करत आहे.
सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर गेल्याकाही दिवसांपासून जहरी टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khiare) यांच्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होण्याच्या अवघे काही तास उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना धमक्या दिल्या जात आहेत, केसेस करू, तडीपार करू अशा धमक्या देण्याचे काम सुरू असल्याचे म्हंटले होते. याचनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतांनी खैरे यांनी वापरलेल्या विधानावरुन चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आनंद दिघे असते तर त्यांना उलटं टांगलं असतं. ते गेल्यानंतर यांच्यात काय काय सुटलं हे राजन विचारे यांना किंवा तेथील शिवसैनिकांना विचारा असं खैरे म्हणाले होते. त्यावरून शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली होती. त्यावरून सातारा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे जोरदार टीका करत आहे.
उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडत माजी खासदार चंद्रकांत खैरे जोरदार टीका करत शिंदे गटाला लक्ष करत आहे.
त्यातच उद्धव ठाकरे यांनी लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत असताना शिवसैनिकांवर दबाव आणण्यासाठी केसेस करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचं म्हंटले होते.
उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे लाईव्ह संवाद साधत असताना शिवसैनिकांवर दबाव आणला जात असल्याचा दावा केला होता.
याचवेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असतांना खोके सरकार, 40 डोक्यांच्या रावणाचा उल्लेख केला होता.