मुंबई : कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेप्रकरणी दोघांवर नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला असून एकाला अटक (Arrest) केली आहे. दिलीप कृष्णा विश्वास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोघा आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 304 (2), 308, 338, 337 आणि 34 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाईक नगर को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील एक चार मजली इमारत काल मध्यरात्री कोसळली. या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू (Death) झाला तर 13 जखमी झाले. जखमींवर सायन आणि राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अग्नीशमन दल आणि एनडीआरएफने शर्थीचे प्रयत्न करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले.
इमारत धोकादायक असूनही जाणूनबुझून घर मालकासहित दिलीप कृष्ण विश्वास यांनी घरं भाड्यावर राहण्यासाठी दिली होती. याप्रकरणी घर मालक आणि दिलीप कृष्ण विश्वास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीत जवळपास 37 कामगारांना राहण्यासाठी घरं दिली गेली होती. या घटनेत 19 कामगारांचा मृत्यू झाला असून इतर 13 कामगार जखमी झाले.
कुर्ला इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 5 राज्य शासनातर्फे पाच लाखांची मदत करण्यात येईल, अशी माहिती नगरविकासमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. राज्याचे नगरविकासमंत्री सुभाष देसाई यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून जखमींना सर्वोतोपरी सहकार्य करण्याबाबत सूचना केल्या. अपघातातील सर्व जखमींचा खर्च राज्य शासन तसेच महापालिकेच्या वतीने करण्यात येईल, असेही देसाई यांनी सांगितले. (A case has been registered against them at Nehru Nagar police station in connection with the Kurla building accident)