शिंदे गटानं बाळसंही धरलं नाही, पण ‘या’ जिल्ह्यात गटबाजीच चर्चा !
खासदार हेमंत गोडसे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक सुरू असतांना विशेष म्हणजे दादा भुसे देखील मंत्रालयातच असल्याचे समोर आले आहे.
नाशिक : बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेत गटबाजीची जोरदार चर्चा होत आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाने बाळसं ही धरलेले नसतांना दिवाळीनंतरही नाराजीचे फटाके फुटत आहे. नुकतीच नाशिकच्या पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे आणि भाजप आमदार यांना टाळून खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक घेतल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासोबत यावेळी शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे हेही उपस्थित असल्याने नाशिकमधील शिंदे गटात नेमकं काय चाललंय अशी चर्चा सुरू झाली आहे. सिडकोच्या मुद्द्यावरून खासदार हेमंत गोडसे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक सुरू असतांना भाजपच्या आमदार सीमा हीरे तिथे पोहचल्या होत्या, मात्रइतर भाजप आमदार कोणीही दिसत नसल्याने त्यांनी गुजरात दौऱ्यावर जाण्याचे सांगत काढता पाय घेतला.
यापूर्वी बैठकांना निमंत्रण नसल्याने आमदार सुहास कांदे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती, त्यात भुसे यांना टाळून गोडसे यांनी दादागिरी केल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
खासदार हेमंत गोडसे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक सुरू असतांना विशेष म्हणजे दादा भुसे देखील मंत्रालयातच असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे बैठकीला निमंत्रण नसल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठकीला गैरहजेरी लावल्याचे समोर आले आहे, त्यामुळे शिंदे गटात गटबाजी असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
यापूर्वी शिंदे गटातील नाराजी सुहास कांदे यांच्या पत्रकार परिषदेने बाहेर पडली होती, त्यात आता गोडसे यांनी भुसे यांना टाळून बैठक घेतल्याने भुसे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिंदे गटाने नाशिकमध्ये चार महीने उलटले तरी बाळसंही धरलेले नाहीत, त्यात दिवाळीनंतरही नाराजीचे फटके फुटत असल्याने शिंदे गटात आलबेल नाही हे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.