आईला बाळाचा मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता…रेल्वेत मदत मागितली पण मिळाली नाही…पण या देवदूतांमुळे बाळाचा मिळाले जिवदान…

बाळाला वाचवण्यासाठी महिला रेल्वे प्रशासन, समोर येईल त्या व्यक्तीकडे जिवाच्या आकांताने माझ्या बाळाला ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्या अशी मागणी करत होती. पण कुणीही या महिलेच्या मदतीला धावून येत नव्हते.

आईला बाळाचा मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता...रेल्वेत मदत मागितली पण मिळाली नाही...पण या देवदूतांमुळे बाळाचा मिळाले जिवदान...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 6:55 PM

नाशिक : कोलकाता ते मुंबई एक महिला आपल्या 13 महिन्यांच्या बाळाला घेऊन असा प्रवास करीत होती. शुक्रवारीची मध्यरात्रीची ही घटना आहे. गीतांजली एक्सप्रेसने ही महिला मुंबईकडे आपल्या बाळाला उपचारासाठी घेऊन जात होती. 13 महिन्यांच्या बाळाला ही महिला व्हेंटीलेटर लावून मुंबईच्या वाडिया रुग्णालयात लवकर कसं पोहचता येईल याच्या विचारात होती. मात्र, दुर्दैवाने गीतांजली एक्सप्रेस ही तब्बल सात उशिराने मुंबईच्या दिशेने धावत होती. आपल्या बाळाला कुठल्याही अडचणीविना सुखरूप कसं नेता येईल या विचारात असतांना ऑक्सिजन पुरवठा करणारे तिन्ही सिलेंडर नाशिकपर्यन्त देखील पुरणार नव्हते. जळगाव स्थानकावरच दोन सिलेंडर संपले होते, तिसरे जवळपास अर्ध्याच्या खाली गेले होते. त्यामुळे बाळाचा ऑक्सिजन पुरवठा संपणार हे निश्चित होते.

याच काळात महिला रेल्वे प्रशासन, समोर येईल त्या व्यक्तीकडे जिवाच्या आकांताने माझ्या बाळाला ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्या अशी मागणी करत होती. पण कुणीही या महिलेच्या मदतीला धावून येत नव्हते.

अशातच जळगावमधून पेशाने डॉक्टर असलेले डॉ. हितेश बारूड हेही रेल्वेने नाशिकला येत होते, महिलेचा रडण्याचा आवाज आणि दरवाज्या जवळ सुरू असलेला गोंधळ पाहून त्यांनी माणुसकी दाखवली.

हे सुद्धा वाचा

स्वतः बाळाची परिस्थिती पाहिली, ऑक्सिजन सिलेंडर नाशिकपर्यन्त पुरेल की नाही याची शास्वती नव्हती, बारूड यांनी याबाबत मदत करायचा लागलीच निर्णय घेतला.

पेशाने डॉक्टर असल्याने ऑक्सिजन कुणाकडे भेटू शकतो, एवढ्या रात्री कोण मदत करेल, त्याची परवानगी मिळेल का नाही ? असे प्रश्न असतांना त्यांनी तीन-चार ठिकाणी फोन केले.

त्यातील कोरोना काळात अनेकांच्या मदतीला धावून गेलेल्या दीपक डोके यांच्या बाबत बारूड यांना माहिती मिळाली, त्यांनी क्षणाचा विलंब न करता फोन करून माहिती दिली.

नाशिकमधील ऑक्सिजन सेवा देणाऱ्यांच्या मदतीने मध्यरात्री डोके यांनी दोन ऑक्सिजन सिलेंडर नाशिकच्या रेल्वेस्थानकावर गीतांजली एक्सप्रेस येईपर्यंत हजर केले होते.

खरंतर सिलेंडर उपलब्ध करण्यासाठी परवानगीचा विषय होता, मात्र बाळाच्या मदतीसाठी देवानेच कुठलीही आडकाठी येऊ दिली नसावी असं म्हणत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाले.

13 महिन्यांच्या बाळाला मुंबईतील वाडीया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जाणार होते, मात्र मध्येच सिलेंडर संपल्याने बाळाचा मृत्यू होण्याची शक्यता अधिकच होती, मात्र, ही दुर्दवी घटना नाशिकच्या देवदूतांमुळे टळली.

हावडा ते मुंबई प्रवास करणारे अनेक जण हा प्रसंग पाहून हळहळ व्यक्त करत होते, मात्र, डॉ. हितेश बारूड, दीपक डोके यांच्या मदतीने बाळाचा जीव वाचल्याने बाळाची आई हात जोडून अश्रु ढाळत आभार मानत होती.

हा प्रसंग पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पाण्याने ओल्या झाल्या होत्या, या घटणेवरुन आजही समाजात माणुसकी जीवंत असल्याचे दर्शन झाले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.