एकीकडे नामांतराची मागणी होत असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराने केली मोठी मागणी, नवा वाद पेटण्याची शक्यता
औरंगाबाद शहराच्या नामांतरानंतर पुन्हा अहमदनगर शहराच्या नावाचा मुद्दा चर्चेत आले आहे. स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : औरंगाबाद शहरानंतर आता अहमदनगर शहराचे नामंतर करण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या वतिने सुरू झाल्या आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकार असतांना राज्य शासनाला पत्र लिहीत अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्या अशी मागणी केली होती. अहिल्यादेवीनगर असे अहमदनगर असे नामकरण करा अशी मागणी केली होती. चौंडी या गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाल्याने त्यांनी ही मागणी केली होती. त्यामध्ये आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्य शासनाने अहमदनगर पालिकेला याबाबत ठराव करून पाठविण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे पालिकेला याबाबत ठराव करता येतो की नाही यावरूनच प्रशासनात गोंधळ सुरू आहे. याबाबत प्रशासनाने याबाबत महासभेत नामंतराचा प्रस्ताव मांडण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहे. यावरुन अहमदनगर जिल्ह्यात मतभेद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी नामांतरापेक्षा जिल्ह्याचे विभाजन करा, कर अशी मागणी केली आहे, त्यामुळे आता नामांतराच्या मुद्याबरोबर जिल्हा विभाजनाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
विभाजनानंतर काय नाव द्यायचं राजकीय आणि सामाजिक संघटनेकडून विचारविनिमय करून निर्णय घ्यावा, उत्तर नगर जिल्ह्यापेक्षा दक्षिण नगर जिल्हा दुष्काळी आहे, त्यामुळे विभाजन झालं तर दक्षिण जिल्ह्याचा विकास होईल असं संग्राम जगताप म्हणाले आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाला भाजप खासदार सुजय विखे यांनी मात्र विरोध केला आहे, तर जिल्ह्याच नामांतर करून जर दुष्काळ मुक्त होत असेल, पाणी येत असेल लोकांचा त्रास कमी होत असेल तर निश्चित नामांतरण केलं पाहिजे.
तर जिल्ह्याचा नामांतराचा प्रश्नासंदर्भात स्थानिक नागरिक, आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन चर्चा करून शासनाने निर्णय घ्यावा असेही सुजय विखे यांनी म्हंटलं आहे.
जो काही निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल त्या निर्णयाशी मी संलग्न राहील, जिल्हा विभाजनाने नगरची ताकद कमी होईल जिल्ह्याचे विभाजन पुढच्या पिढीसाठी धोकादायक निर्णय असेल
काही लोकांना आमची अडचण असेल, त्याच लोकांची वारंवार ही मागणी येत राहते असा टोलाही सुजय विखे यांनी लगावला आहे.
त्यामुळे येत्या काळात राजकीय मुद्द्यावरून नेहमीच तापलेला अहमदनगर जिल्हा पुन्हा नामंतरच्या मुद्द्यावरू येत्या काळात तापणार हे निश्चित आहे.