चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांची घोषणा
क्षमता वाढविण्याच्या प्रयत्नात आता 20 टन क्षमतेची रिफायनरी चंद्रपुरात स्थापन करू आश्वासन पुरी यांनी दिले आहे. चंद्रपूरमध्ये भाजपच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
चंद्रपुर : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी(Union Petroleum Minister Hardeep Singh Puri) यांनी चंद्रपुरमध्ये एक महत्त्वाची घोषणा केली आहे. चंद्रपुरात 20 टन वार्षिक क्षमतेची पेट्रोलियम रिफायनरी(petroleum refinery ) स्थापन करणार असल्याचे पुरी यांनी जाहीर केले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुरी यांची पक्षाकडून नियुक्ती झाली आहे.
पेट्रोलियम खात्याने 252 पासून 400 मिलियन मेट्रिक टन वार्षिक रिफायनिंग क्षमता वाढविल्याची माहिती पुरी यांनी दिली. मागच्या सरकारने रत्नागिरी येथील प्रकल्प रखडवले. मात्र, आता 20 टन क्षमतेची रिफायनरी चंद्रपुरात स्थापन करू असे आश्वासन पुरी यांनी दिले आहे.
क्षमता वाढविण्याच्या प्रयत्नात आता 20 टन क्षमतेची रिफायनरी चंद्रपुरात स्थापन करू आश्वासन पुरी यांनी दिले आहे. चंद्रपूरमध्ये भाजपच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
राज्यात लोकसभेच्या भाजपने गमावलेल्या जागा पुन्हा खेचून आणण्यासाठी पक्षाने विशेष मोहिम राबवली आहे. लोकसभा प्रवास अभियान भाजपने सुरु केले आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत राजकीय स्थिती अनुकूल असताना भाजपने चंद्रपूरची जागा गमावली होती. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राज्यात एकाच ठिकाणी काँग्रेसला यश मिळाले होते. भाजपच्या विजयासाठी केंद्रीय मंत्री पुरी तीन दिवस लोकसभा क्षेत्रात मुक्कामी आहेत.